Ticker

6/recent/ticker-posts

एम.एस.गोटे महाविद्यालयात रंगली सौन्दर्य स्पर्धा


एम.एस.गोटे महाविद्यालयात रंगली सौन्दर्य स्पर्धा 



     मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित सौंदर्य स्पर्धा महाविद्यालयात सुरु असलेल्या ब्युटी अँड वेलनेस या विभागाकडून घेण्यात आली. त्यात गृहिणी पासून महाविद्यालयीन युवतींनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या राज्यातील वेशभूषा परिधान करून आपली कला सादर केली. ब्युटी अँड वेलनेस हा अभ्यासक्रम व्यावसायिक असून महिलांना आपले घर सांभाळून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणारा एक अभ्यासक्रम आहे. स्त्रियांना आपली कला व सुप्तगुण दाखविण्याची संधी या मंचाच्या माध्यमातून देण्यात आली. त्यात साक्षी इंगळे साऊथ इंडियन, राणी मुसळे राजस्थानी, दिशा धामणे बंजारा, लक्ष्मी राठोड व गीता लोखंडे मुस्लिम, अंकिता काळे देवसेना, प्रगती कांबळे महाराष्ट्रीयन नववधू, दिव्या सिंगरोल पंजाबी, भावना व्यवहारे मारवाडी हे वेष परिधान करून स्पर्धेत भाग घेतला. त्यात राणी मुसळे प्रथम, प्रगती कांबळे द्वितीय व भावना व्यवहारे हिने तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे परीक्षण अर्चना व्यवहारे यांनी केले.  या संपूर्ण स्पर्धेचे संचालन कु.मुस्कान नौरंगाबादी हिने केले. प्रास्ताविक डॉ.पी.एस.पाथरकर यांनी केले तर आभार प्रा.प्रियंका इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रीती कोरणे, साबदे, शिवानी अडगडे, रोशनी यादव, नेहा इंगोले, गौसिया शेख, अंकिता वानखेडे, कविता शिंदे, संध्या अडगडे, मयुरी लोखंडे, सविता मापारी आदींनी अथक परिश्रम घेतले.