नागरीकांनो, अतिआवश्यक असेल तरच कार्यालयात या
जिल्हा परिषद प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
जिल्हयातील सर्व कार्यालयातील बायोमॅट्रीक हजेरी बंद
वाशिम, दि. १६ : कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हयातील नागरिकांनी शासकीय कार्यालयात येणे टाळावे. या विषाणूचा संसर्ग टाळण्याकरीता अत्यावश्यक असल्यासच कार्यालयात यावे अन्यथा पत्रवहार करुन आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रसार झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली असुन मोठया प्रमाणात जिवित हानी होत आहे. कोरोना विषाणूंमुळे बाधित रुग्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी आढळुन आले आहेत. या घटनेला राष्ट्रीय आपत्ती म्हणुन घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविदयालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. जिल्हयातील सिनेमाग्रह, मॉल्स, लॉन्स इत्यादी सर्व सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमविण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर मंत्रालयात येणार्या नागरिकांनाही शासनाच्या वतीने प्रतिबंध घालण्यात आला आहे आणि आज दि १६ मार्च रोजी परिपत्रक काढुन व व्हिडिओ कॉन्फरंस घेऊन शासकीय कार्यालयामध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांनी सुध्दा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आवश्यकता नसतांना घर अथवा गावाबाहेर पडु नये. या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी केवळ अत्यावश्यक प्रसंगी शासकीय कार्यालयात यावे अथवा जिल्हा परिषदेच्या लशेूिुरीहळासारळश्र.लेा या ईमेल वर पत्रव्यवहार करुन आपल्या समस्या मांडाव्यात, त्याला प्रशासनाच्या वतीने तात्काळ प्रतिसाद देण्यात येईल असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ