पोहरादेवी, उमरी खुर्द येथे ५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करणारा जमावबंदी आदेश लागू
कलम १४४ ची अंमलबजावणी : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक
वाशिम, दि. १६ : ‘कोरोना’चा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पोहरादेवी, उमरी खुर्द येथे राम नवमीदरम्यान होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २३ मार्च ते ५ एप्रिल २०२० या कालावधीत पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज संस्थान व उमरी खुर्द येथे व यात्रेच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये ५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करणारा जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असल्याचे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
‘कोरोना’ची सुरुवात जनावरांपासून झाल्याचे लक्षात आले आहे. तसेच देशात या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणार्या व्यक्तीलाही या विषाणूचा संपर्क होत असल्याने गर्दी होणारे यात्रा, मेळावे यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या ३ मार्च रोजीच्या मार्गदर्शिकेमध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी यांनी पोहरादेवी, उमरी खुर्द येथील यात्रा रद्द करण्याचे आदेश १४ मार्च २०२० रोजी निर्गमित केले आहेत. तसेच २३ मार्च ते ५ एप्रिल २०२० या कालावधीत पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज संस्थान व उमरी खुर्दकडे जाणार्या ८ मार्गांवरील वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये व जीवित हानी होवू नये, यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोहरादेवी, उमरी खुर्द येथे व यात्रा परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यासाठी २३ मार्च २०२० ते ५ एप्रिल २०२० या काळात संत सेवालाल महाराज संस्थान, पोहरादेवी व उमरी खुर्द येथे व यात्रेच्या परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ