पंचशिलनगर येथे संत गाडगेबाबा जयंती व सत्कार कार्यक्रम
वाशिम :24 फेब्रु.- स्थानिक पंचशिलनगर येथील महाराष्ट्र राज्य दलितमित्र पुरस्कारप्राप्त महर्षि संत गाडगे महाराज विद्यालयात संस्था अध्यक्ष राजु धोंंगडे यांच्या आयोजनातुन स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा जयंती व विविध सामाजीक कार्यकर्त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम 24 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोग फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. संगीता वसंत इंगोले ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सावित्री महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा सौ. किरणताई गिर्हे, राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त निलेश सोमाणी, संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशील भिमजीयाणी, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक सम्यक मेश्राम, सर्वधर्मीय आपातकालीन संस्था कारंजाचे अध्यक्ष शाम सवाई, श्रेयस पसारकर, विशाल घोडे, रामदास गाडेकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पुजन करुन करण्यात आली. अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांचा सत्कार संस्था अध्यक्ष राजु धोंगडे यांनी शेला, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून केला.
याप्रसंगी सौ. संगीता इंगोले यांनी विद्यार्थ्यांना पेन व चॉकलेट तर निलेश सोमाणी यांनी वह्या व पुस्तकाचे वितरण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शाळेतील शिक्षक सिध्दु वानखडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एन.जे. वाघ, शिक्षक एस.व्ही. जोगदंड, एम.टी. साखरे, एस.के. इंगोले, व्ही.एम. ढोबळे, आर.व्ही. चौधरी, एस.पी. वानखडे, पी.बी. तोष्णीवाल व एस.डी. मुसळे आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्याना खिचडी वाटप करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.