Ticker

6/recent/ticker-posts

गजानन देवळे मित्रमंडळाच्या वतीने डॉ. अरुण बाबा इंगोले यांना आदरांजली


गजानन देवळे मित्रमंडळाच्या वतीने 
डॉ. अरुण बाबा इंगोले यांना आदरांजली


जनमाध्यम न्युज मिडीया
मालेगाव :1 मार्च - लोकनेते डॉ. अरुण बाबा इंगोले यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त 28 फेब्रुवारी रोजी गजानन देवळे मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या समाधी स्थळा वर जाऊन भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली .
 डॉ . अरुण बाबा इंगोले हे या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेतृत्व होते . तळागाळातील जनतेला त्यांनी न्याय मिळवून दिला. सर्वसामान्यांच्या सुख - दु:खात त्यांनी मदत केली . गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविल्या . त्यामुळेच आज त्यांना जाऊन बारा वर्ष झाली तरी त्यांचे नाव आदराने घेतले जाते. या तालुक्यात त्यांनी शेकडो कार्यकर्ते तयार केले . त्यांना माननारा आजही मोठा वर्ग आहे . ते बाबांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधी स्थळावर जाऊन आदरांजली वाहत असतात .
तालुक्यामध्ये विविध राजकीय पक्षामधील अनेक जाती धमार्तील आदींनी समाधी स्थळावर जाऊन बाबांच्या समाधी घर पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली . यावेळी कृउबासचे गजाननराव देवळे अशोक राव गवळी बाबू आप्पा गोंडाळ सुभाष देवळे निळकंठ कुठे भागवत बळी पप्पू कुटे गणेश देवकर विनायक काटेकर सत्तार शहा खाजाभाई आयय्युभ यांच्या सह गजानन भाऊ देवळे मित्र गजानन भाऊ देवळे मित्र मंडळ उपस्थित होते. याप्रसंगी पप्पू कुटे यांनी विचार व्यक्त केले .