कोरोना वायरसशी भारताची झुंज :
भारत सरकारने बेरोजगार झालेल्या सर्वांना केरळ ,उत्तर प्रदेश राज्यासारखी आर्थिक मदत तात्काळ द्या -किशोर तिवारी
दिनांक - २२ मार्च २०२०
कोरोना विषाणूंविरूद्ध भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी सर्व राजकीय व वैचारिक मतभेद बाजुला ठेऊन अख्खा देश एकवटला मात्र लहान व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांनी ग्रामीण भारतात व गावात काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीचे संकट आले असुन त्यांना केरळ उत्तरप्रदेश राज्यांच्या धर्तीवर आर्थिक मदत त्यामध्ये अन्नपुर्णा योजनेचा विस्तार करून सर्व शिधापत्रिका धारकांना घरपोच फुकट पुढच्या तीन महिन्याचे डाळ गहु तांदूळ व तेल त्याच बरोबर घर खर्चाला आर्थिक अनुदान देण्याची मागणी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी केली आहे .
जगातील व भारतातील सर्व सरकारे उद्योग समुह व संघटीत क्षेत्रातील कामगारांचे हीत जोपासण्यात मोठमोठाले आर्थिक पॅकेज घोषीत करीत आहेत मात्र व्यापारी असंघटित कामगार जनता संचारबंदी तन मन धन लावून उतरला आहे मात्र यामुळे भयंकर उपासमारी व आर्थिक संकटामुळे कोरोनापेक्षा जास्त बळी जाण्याची परिस्थिती निर्माण होत आहे
अनेक राज्यात माल हॉटेल रेस्टारेंस्ट पान टपरी बंद करण्याचे आदेशसुरवातीला देण्यात आले मात्र आता सारेच दुकाने बंद केल्या आहेत अचानक रेल गाड्या व वाहने रद्द केल्याने हजारो प्रवाशी कमालीची गर्दी करून प्रवास करीत आहेत यामुळे गरीबांना उपासमारीला तोंड देण्यास लावत आहेत हजारो मजूर शहरातुन गावाला परत जात आहेत यामुळे सर्वात जास्त संक्रमण गावा गावात व खेड्या खेड्यात होत आहे यासाठी आहे तेथे राहण्यासाठी आर्थिक अनुदान अन्न सुरक्षा देण्याची व वैद्यकीय सुविधा देण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
"कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे किंवा यावर तोडगा निघेल अशी आशा आहे, असे लोकांना आश्वासन हवे आहे." तसेच सरकारने प्रथम या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला पाहिजे त्यासाठी चायना इटाली स्पेन अमेरीका सारखं लोकांनी सरकारला सहकार्य दिल आहे मात्र सरकारने चायना स्पेन इटाली सारखं आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे मात्र सरकारने व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांना वाऱ्यावर सोडले बरोबर नाही कारण कोरोनाच्या भीतीमुळे चिकन भारतात ९० टक्के स्वस्त झाले आहे त्यामुळे या उद्योगाशी जुडलेले सर्व व्यापारी असंघटित कामगार उपाशी मरत आहेत या सारखे अनेक धंदे बंद झाले आहेत मात्र मोठ्या उद्योगासाठी पॅकेज वर पॅकेज घोषीत करण्यासाठी टास्क फोर्स तयार करतात आज भारतात व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांची संख्या ७० टक्के आहे या कोरोना वायरसचा फटका यांना सर्वात जास्त बसत आहे मात्र यांच्यासाठी आर्थिक पॅकेज घोषीत करण्याची मागणी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किशोर तिवारी यांनी केली आहे .
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ