जिल्हास्तरीय लोककला उत्सवाला प्रतिसाद
जनमाध्यम न्युज मिडीया
वाशिम :1 मार्च - नेहरु युवा केंद्र, वाशिम व राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था, वाशिमचे वतीने जिल्हा युवा सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा युवा सम्मेलनाचे उदघाटक म्हणून उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, कायक्रमांचे अध्यक्ष जिल्हा युवा समन्वयक सम्यक मेश्राम प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते निलेश सोमाणी, जिल्हा युवा पुरस्कार विजेते भगवान ढोले , भिमराव पट्टेबहादुर , पि. एस. खंदारे, कायक्रम यशस्वीतेसाठी राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादुर, अशांत कोकाटे, आकाश राठी, प्रविण पळसकर, प्रदिप पट्टेबहादुर, प्रविण पट्टेबहादुर, समाधान करडीले, नितीन आढाव, अविनाश नाईक, अंकीत राऊत, विजय सावळकर यांनी परीश्रम घेतले. ज्युरीची चोख भुमीका अभिनेता अरविंद उचित व अभिनेत्री हंसिनी उचित यांनी पार पाडली लोककलेमध्ये तब्बल 42 युवामंडळानी सहभाग नोंदविला प्रथम, द्वितीय क्रमांक प्राप्त कलावंताना जिल्हा युवा समन्वयक सम्यक मेश्राम, राजरत्न संस्था मार्गदशक भिमराव पट्टेबहादुर, यश कंकाळ, आयोजक तथा राजरत्न संस्था अध्यक्ष विनोद पट्टेबहादुर, अशांत कोकाटे, आकाश राठी, प्रविण पट्टेबहादुर, प्रदिप पट्टेबहादुर, संजय भांदुग यांची उपस्थिती होती.