वाशीम आगारात मराठी भाषा गौरव दिन संपन्न
वाशिम :27 फेब्रु.- मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एस.टी. महामंंडळाच्या वतीने येथील आगारातल बसस्थानकावर हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषेच्या गौरवदिनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील आगारप्रमुख विनोद इलामे होते. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार विश्वास वाल्ले तथा येथील वाहतुक निरिक्षक नंदकिशोर तेलगोटे उपस्थित होते. प्रारंभी येथील आगारप्रमुख यांचे स्वागत मदतनिस अलीम यांनी केले. त्यांनी यावेळी मराठी भाषेचे महत्व तथा महामंडळांनी मराठी भाषेचा आदर केल्याचे म्हटले. मागील चार वर्षापासून लोकवाहीनी तर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो.
मराठी भाषेची वाटचाल व्हावी असे आवाहन विनोद इलामे यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी विश्वास वाल्ले व वा.नि. तेलगोटे यांनी मराठी मायबोली भाषेचे शाळेत प्रभुत्व कमी होत असल्याने शासनाच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे संचालन आशिष वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री मडके, गाभणे, खंडेलवाल, चपटे, अलीम, संजय इंगोले यांनी परिश्रम घेतले. यावेळी आगारातील वाहक, चालक तथा कर्मचारी बहूसंख्येने उपस्थित होते.