जिजेबाची नात योगीताने राज्यस्तरीय रोड सायकलींग स्पर्धेेत पटकावला तिसरा क्रमांक
वाशीममध्ये आयोजन : जिल्ह्याच्या सन्मानात भर
वाशिम, 4 मार्च - सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व वाशीम जिल्हा सायकलींग असोसिएशन यांच्या आयोजनातून 29 फेब्रुवारी रोजी स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या राज्यस्तरीय रोड सायकलींग स्पर्धेत तालुक्यातील हिवरा तांदळी येथील डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालयाची विद्यार्थीनी व ग्राम मोहजा रोड येथील जिजेबा नारायण कढणे यांची नात कु. योगीता कव्हर हिने चमकदार कामगिरी करुन तृतीय क्रमांक पटकावला.
लहानपणीच मातृपितु छत्र हरविलेल्या योगीता ही मोहजा रोड येथे आजोबा जिजेबा नारायण कढणे यांच्याजवळ राहते. योगीताला लहानपणापासून सायकलींगची आवड होती. हा तीचा गुण हेरुन आजोबांनी तीला विविध स्पर्धेत खेळण्यास प्रवृत्त केले. योगीतानेही अत्यंत परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर तालुका, जिल्हा, विदर्भस्तरीय आणि राज्यस्तरीय अशी मजल मारत विविध स्पर्धेत भाग घेवून अनेक पारितोषीके पटकावली आहेत. 12 जानेवारी रोजी नागपूर येथील यशवंत स्टेडीयममध्ये पार पडलेल्या ‘खेलो नागपूर खेलो’ खासदार चषक स्पर्धेत योगीताने सायकलींग प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करुन विदर्भातुन प्रथम क्रमांकाने येवून सायकल पोलो बेस्टवेअर पुरस्कारावर आपले नाव कोरले. यावेळी केंद्रीय रस्ते विकासमंत्री खा. नितीन गडकरी यांच्या हस्ते योगीताला पुरस्कारपत्र व पदक देवून योगीताचा सत्कार करण्यात आला होता. याशिवाय जिल्हास्तरावर गोल्ड मेडल व महाराष्ट्र स्तरावर दोन सिल्व्हर पदक पटकावले आहे.
जिल्हा क्रीडा संकुलावर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात नगराध्यक्ष अशोक हेडा, माजी जि.प. अध्यक्षा सौ. हर्षदाताई देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अरुणराव सरनाईक, वाशीम जिल्हा सायकलींग असोसिएशनचे उपाध्यक्ष धनंजय वानखेडे, डॉ. पंजाबराव देशमुख शाळेचे मुख्याध्यापक दानमोडे आदींच्या हस्ते तीला सन्मानचिन्ह, सन्मानपदक, प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय योगीताने आजोबा जिजेबा पाटील, आजी सौ. कस्तुराबाई पाटील, धनंजय वानखेडे, मुख्याध्यापक दानमोडे आदींना दिले आहे.
या रोड सायकलींग स्पर्धेतील विशेष बाब म्हणजे यातील इतर स्पर्धकांजवळ महागड्या सायकली असतांना योगीताने आपली साधी सायकल वापरुन हे दैदीप्यमान यश मिळविले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ