माता व नवजात बालकाला बेबीकेअर किटचे वितरण
जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यक्रम
वाशिम - बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) यांच्याकडून नागरी प्रकल्प अधिकारी सुभाष राठोड, मुख्य सेविका सुरेखा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पंचशिलनगर येथील अंगणवाडी क्रमांक 59 मध्ये नोंदणी केलेल्या नवजात बालकाच्या मातेला बेबीकेअर किट वितरणाचा कार्यक्रम सोमवार, 2 मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात आला.
नवजात बालकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रसुतीनंतर जन्माला येणार्या बालकांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठराविक साहित्य असलेली बेबी केअर किट पुरविण्याची योजना 2018 मध्ये आखण्यात आली. मात्र त्याची प्रत्यक्ष आता केली जात आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाच्या मातेला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नितीन व्यवहारे, डॉ. अविनाश सोनुने, स्टॉफ नर्स सुनिता साबळे, पंचशिलनगर अंगणवाडी क्रमांक 59 च्या अंगणवाडी सेविका सौ. वंदना सुतार यांच्या हस्ते बेबी केअर किट देण्यात आली. या बेबी केअर किटमध्ये नवजात बालकाचे कपडे, प्लॉस्टीक लंगोट, झोपण्याची लहान गादी, टॉवेल, तापमापक यंत्र, 250 मिली अंगाला लावण्याचे तेल, मच्छरदाणी, छोट्या आकाराचे ब्लँकेट, लहान प्लॉस्टीक चटई, 60 मिली शाम्पु, खेळणी खुळखुळा, नख काढण्यासाठी नेलकटर, हातमोजे, पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्वीड, लोकरीचा कापड, बॉडी वॉश लिक्विड व सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग आदी साहित्याचा या किटमध्ये समावेश आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ