Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय तंत्रनिकेतन येथे शिवणकाम, डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन


शासकीय तंत्रनिकेतन येथे शिवणकाम, डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन
वाशिम, दि. ११ : जिल्हा परिषद व शासकीय तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा उपकर योजने अंतर्गत ग्रामीण भागातील युवक, युवतींना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शिवणकाम व डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती शोभाताई गावंडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्राचार्य डॉ. वि. रं. मानकर, ल. की. लोणकर, रा. गो. बिलोलीकर, श्रीमती जायदे, श्रीमती कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मानकर म्हणाले, प्रशिक्षण वर्गासाठी निवड झालेल्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन शिवणकाम, संगणकीय कौशल्य आत्मसात करावे. तसेच शासकीय तंत्र निकेतनच्या सुसज्ज संगणक प्रयोगशाळेचा वापर करून संगणकाचे अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घ्यावे.
श्री. लोणकर यांनी सामुदाय विकास योजनेबाबत माहिती दिली व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव सावके, सुनील गडेकर, सुभाष होनाळे, प्रशिक्षक संग्राम काळे, गजानन सावके यांनी परिश्रम घेतले.
रिसोड, मालेगाव येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर व मंगरूळपीर, मानोरा, कारंजा येथे शिवणकाम व ब्युटी पार्लरविषयी प्रशिक्षण वर्ग लवकरच सुरु होत असल्याने संबंधित क्षेत्रातील अनुभवी व इच्छुक प्रशिक्षकांनी वाशिम शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य अंतर्गत सामुदाय विकास योजना समन्वयक यांच्या कार्यालयाशी अथवा ९८२२९७६५६२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य यांनी केले आहे.