Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत विविध स्पर्धा

वाशिम, 5 मार्च - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक 8 मार्च 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला खेळाडू यांच्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला, युवती यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला, युवतींसाठी स्वसंरक्षणाचे डावपेच, एरोबिक्स, फुगडी, लंगडी, चर्चासत्र, परिसंवाद यासह कबड्डी, 100 मीटर धावणे या क्रीडा स्पर्धा तसेच महिला खेळाडूंचे सत्काराचे आयोजन महिला आर्थिक विकास महामंडळ, स्थानिक मार्शल आर्ट व फिटनेस, वाशिमच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने दिली आहे.