Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी वाशीम येथील श्री गजानन महाराज संस्थानचे दोन महत्वपुर्ण निर्णय

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी वाशीम येथील श्री गजानन महाराज संस्थानचे दोन महत्वपुर्ण निर्णय
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर श्रीराम नवमी उत्सव कार्यक्रम यावर्षी स्थगीत
दर गुरुवारी होणारा महाप्रसाद कार्यक्रमही तहकुब
वाशीम - जगभरात धुमाकुळ घालणार्‍या कोरोना विषाणूस महाराष्ट्रात प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. कोरोना हा विषाणूचा संसर्ग समुहाव्दारे होत असल्यामुळे शासनाकडून विविध यात्रा, उत्सव, जत्रा, मेळावे आदी रद्द करण्याचे आदेश दिले असून शासनाच्या या आदेशाने पालन करुन राज्यातील विविध धार्मिक देवस्थानांची मंदिरे भाविकांसाठी शासनाच्या पुढील आदेशापर्यत बंद करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व भाविक भक्तांना या विषाणूची लागण होवू नये या दृष्टीकोनातून शासनाने केलेल्या आवाहनानुसार आयुडीपीस्थित श्री संत गजानन महाराज संस्थानने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर श्री संत गजानन महाराज सेवा समितीची विशेष सभा 15 मार्च रोजी संस्थानच्या कार्यालयात झाली. या बैठकीत सर्वसहमतीने झालेल्या निर्णयानुसार संस्थानच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा 2 एप्रिल रोजीचा श्रीरामनवमी उत्सवाचा कार्यक्रम या वर्षापुरता स्थगीत करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय संस्थानच्या वतीने दर गुरुवारी महाप्रसादाचे वितरण भाविक भक्तांना करण्यात येते. या महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळे दर गुरुवारी होणारा महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संस्थानच्या पुढील होणार्‍या सभेपर्यत तहकूब करण्याचा करण्याचा महत्वपुर्ण निर्णय या सभेत घेण्यात आला आहे. श्रीं च्या सर्व भाविकांनी वर्तमान परिस्थितीत उद्भवलेल्या कोरोना या संकटाचा सामना करण्यासाठी संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.