रिसोड येथे १७ मार्च रोजी होणारा रोजगार मेळावा रद्द
वाशिम, दि. ११ : बेरोजगार युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रिसोड नगरपरिषद व रिसोड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत १७ मार्च रोजी रिसोड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग राज्यात सुद्धा आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रिसोड येथील रोजगार मेळावा रद्द करण्यात आला आहे. मेळाव्याची नवीन तारीख नंतर कळविण्यात येईल, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये राज्यभरतील १० उद्योजकांकडील २०३ रिक्तपदे मुलाखत व तत्सम प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार होती. मात्र कोरोना विषाणूच्या प्रसाराला अटकाव घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे, असे श्रीमती बजाज यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ