भारताच्या क्रांतीकारी स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे मोठे योगदान - कांबळे
जिजाऊमाता बहूउद्देशिय शिक्षण संस्थेच्या कार्यालयात महिला दिन कार्यक्रम
वाशीम - भारतीय भूमि परकीयांच्या तावडीतुन सोडण्यासाठी अनेक महिलांनी सशस्त्र लढा दिला. व परकीयांना पिटाळून लावले. यासोबतच राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झांशीची राणी लक्ष्मीबाई, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर आदी महिलांनी आपल्या राज्यात समान धोरण राबवुन महिलांच्या शैक्षणिक, सामाजीक व आर्थिक विकासासाठी मोठे क्रांतीकारी कायदे केले आहे. त्यामुळे आजचा महिला दिन साजरा करीत असतांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील या क्रांतीकारी महिलांचे योगदान विसरता येणार नाही असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक म्हणून सविता कांबळे यांनी केले.
स्थानिक ढवळेवाडी येथे जिजाऊमाता बहूउद्देशिय शिक्षण संस्थेच्या बहूउद्देशिय संस्थेच्या कार्यालयात 8 मार्च रोजी जागतीक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक सम्यक मेश्राम हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता कांबळे, प्रमुख पाहुणे म्हणून लाईफ गेन थेरपीचे अध्यक्ष डॉ. राजु सोनी, विनोद पट्टेबहादुर, जलदुत प्रविण पट्टेबहादुर, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अशांत कोकाटे, शुभांगी ताजणे, अनिता जोगी, दिपाली नारंग, नैना काकडे, प्रिती तायडे, शितल ढोले, चंद्रभागाबाई ढवळे, कल्पना कांबळे, धम्मशिला ढवळे, कल्पना मोठे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व महामातांच्या प्रतिमतांचे पुजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी लहान मुलींनी आपल्या मनोगतामध्ये महिला दिनाविषयी माहिती विषद केली. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करुन यश संपादन करणार्या महिला व मुलींचा महिला दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतातुन उपस्थित मान्यवरांनी जागतीक महिला दिनाचे महत्व सांगुन बेटी बचाव बेटी पढाव ही काळाची गरज असल्याचे नमूद करीत मुलींना दर्जेदार शिक्षण देवून त्यांना मुलांच्या बरोबरीने समाजात स्थान देण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन प्रिती कांबळे तर आभार रुपाली कोकाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोलु कांबळे, निकीता कांबळे, योगेश बन्सोड आदींसह जिजाऊमाता संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व पदाधिकारी व परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ