Ticker

6/recent/ticker-posts

जनता संचारबंदी उत्स्फूर्त यशस्वी केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

जनता संचारबंदी उत्स्फूर्त यशस्वी केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
जनजागृतीमुळे कोरोना कायमचा निघून जाईल
मुंबई दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार एकजुटीने उत्स्फूर्तपणे जनता संचारबंदी सर्व भारतीयांनी प्रचंड यशस्वी केली. कोणी नाही काढली बाहेर वरात सर्वच राहिले घरात असे सांगत  जन संचारबंदीच्या काळात सायंकाळी 5 वाजता सर्व भारतीयांनी  टाळी वाजवून थाळीनाद करून डॉक्टर ; आरोग्य सेवकांचे जाहीर आभार मानले आहेत. आरोग्य सेवकांसाठी  केलेला टाळीनाद आणि  थाळीनाद; हा कोरोना ला कायमचा निघून जाण्याचा आवाज ठरणार  आहे.कोरोना विरुद्ध जनजागृती चा हा शंख नाद ठरणार आहे .कोरोना कायमचा निघून जाण्यासाठी  मी सुद्धा सर्वप्रथम गो कोरोना ; कोरोनो गो चा नारा दिला होता असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले  यांनी केले आहे.
आज सायंकाळी 5 वाजता बांद्रा येथील संविधान निवासस्थानी ना. रामदास आठवले यांनी सहकुटुंब टाळ्या वाजवून थाळीनाद करून अहोरात्र कोरोना विरुद्ध लढणाऱ्या आपल्या डॉक्टर; अधिकारी; सुरक्षा कर्मचारी आणि आरोग्य सेवकांचे  आभार मानले. यावेळी सौ.सीमाताई आठवले;कुमार जित आठवले ; शकुंतलाताई  आठवले ; नंदाताई काशीकर हे सर्व कुटुंबीय टाळ्या वाजवून थाळीनाद करण्यासठी एकत्र आले होते.
जन संचारबंदी च्या काळात ना. रामदास आठवले आज दिवसभर त्यांच्या संविधान निवासस्थानी कुटुंबासह घरीच थांबले होते. बाहेर कुणीच काढू नका वरात सर्वांनी दिवसभर राहा घरात ; यशस्वी करूया जन संचारबंदी त्यामुळे मिळणार नाही कोरोना ला संधी असे आवाहन करून ; सरकार ने दिलेल्या सूचना पाळा; गर्दी मध्ये जाणे टाळा असे आवाहन ना.रामदास आठवलेंनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महानगरांमध्ये कलम 144 लागू केले आहे. रेल्वे लोकल ट्रेन तसेच कार्यालये बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जन कर्फ्यु च्या आवाहनाला जनतेने उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यातून जनतेत कोरोना विरुद्ध लढण्याची जागृती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. जनतेने असाच संयम पाळावा  आणि गर्दीत जाण्याचा विचार टाळावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.