Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते वाशिमची सुवर्णकन्या राष्ट्रीय कुस्तीपटु कल्याणी गादेकरचा सत्कार


पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते वाशिमची सुवर्णकन्या राष्ट्रीय कुस्तीपटु कल्याणी गादेकरचा सत्कार
वाशीम - 12 मार्च 2020 रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते वाशिमची सुवर्णकन्या कुस्तीपटु कल्याणी पांडुरंग गादेकर हिचा सत्कार करण्यात आला.
  दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी गुवाहाटी (आसाम) येथे खेलो इंडिया (नॅशनल) कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कुस्ती स्पर्धेत 17 वर्षाआतील 46 किलो वजन गटात कल्याणी पांडुरंग गादेकर हिने इतिहास रचुन सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच दिनांक 27 जानेवारी 2020 रोजी पटणा ( बिहार ) येथे झालेल्या कॅडेट (नॅशनल) कुस्ती स्पर्धेत 17 वर्षाआतील 46 किलो वजन गटात पुन्हा उत्कृष्ट कामगिरी सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच यापुर्वी सुध्दा कल्याणीने 9 वेळा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा खेळलेली आहे व राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुध्दा सुवर्ण पदक प्राप्त करुन वाशिम जिल्हा व महाराष्ट्राचे नाव संपुर्ण भारतामध्ये लौकिक केले. तसेच तिचे पुढील महीण्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धाच्या निवड चाचणी करीता ती पात्र झाली आहे . व येणार्‍या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धमध्ये सुध्दा भारताचे नाव संपुर्ण जगात नाव लौकिक करण्याकरिता व आतंरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याकरिता शुभेच्छा दिल्या. कल्याणी पांडुरंग गादेकर हिचा सत्कार करतांना पोलिस अधिक्षक वसंत परदेशी साहेब, अप्पर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, जेल पोलिस अधिक्षक सोमनाथ पाडुळे, वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शिवाजी ठाकरे, राखिव पोलिस निरिक्षक संजय क्षिरसागर, अ‍ॅड. रुपेश चौधरी, सुनिल व्यवहारे, पाडुरंग गादेकर, पोलिस शिपाई प्रल्हाद आळणे, पोलिस शिपाई श्रीकृष्ण वानखेडे हे उपस्थित होते.