Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात अर्बन महानेट प्रकल्प राबविण्यास सुरुवात


जिल्ह्यात अर्बन महानेट प्रकल्प राबविण्यास सुरुवात
वाशिम, दि. १७ : शासनाच्या वेगवेगळ्या विभागांना शहरी, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आदी २७ विभागांना जोडून ई-गव्हर्नन्स म्हणजेच जीआरसी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भागात अर्बन महानेट प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली आहे.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञान मंडळातर्फे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे अर्बन महानेट प्रकल्पाचा आज, १७ मार्च रोजी आयोजित उद्घाटन समारंभ रद्द करण्यात आला. जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी औपचारिक मान्यता देवून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी तथा वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांची उपस्थिती होती. प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी  अथवा काही अडचण असल्यास जिल्हा समन्वयक जुनैद शेख (भ्रमणध्वनी क्र. ९३१६७७२४४७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक प्रशांत जाधव यांनी केले आहे.