Ticker

6/recent/ticker-posts

समाजसेविका डॉ . मंजूश्री जांभरूणकर आंतरराष्ट्रीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित 

 


समाजसेविका डॉ . मंजूश्री जांभरूणकर आंतरराष्ट्रीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित


वाशिम - बेटी फाऊंडेशन वणी जि . यवतमाळच्या वतीने समाजातील कर्तबगार महिलांचा सन्मान आणि जागतिक महिला दिनानिमित्ताने नारीरत्न , बालिकारत्न , समाजरत्न व साहित्यरत्न पुरस्काराने आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात येथील समाजसेविका डॉ. मंजुश्री जांभरुणकर यांना नारीरत्न या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यात महिलांना आंतरराष्ट्रीय नारीरत्न , २० महिला / पुरूष यांना आंतरराष्ट्रीय समाजरत्न व साहित्यरत्न तसेच ५ बालिकांना आंतरराष्ट्रीय बालिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
सामाजिक कार्यकर्त्या डॉ . मंजूश्री जांभरूणकर ह्या इनरव्हील क्लब सदस्या , तनिष्का सदस्या , निमा अध्यक्षा वाशिम असून गेल्या २० - २५ वर्षापासून सामाजिक , धार्मिक चळवळीशी निगडीत असून त्यांनी मरणोत्तर नेत्रदान , बेटी बचाओ - बेटी पढाओ , योगा प्रचार व प्रसार , किशोरवयीन मुलींकरीता ' कळी उमलतांना ' या कार्यक्रमातून जाणीवजागृती असे अनेक सामाजिक उपकम राबविले आहेत . त्यांच्या कार्याची दखल बेटी फाऊंडेशन वणी , जि . यवतमाळ तर्फे घेतल्या जावन वाशिम येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ . मंजूश्री जांभरूणकर यांना आंतरराष्ट्रीय नारीरत्न पुरस्काराने संस्था अध्यक्ष प्रिती दरेकर , श्री वामनरावजी कासावार , माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा . सिंधु तुपकर जेष्ठ निवेदिका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून बेटी फाऊंडेशन चे सचिव , मा . विनोद दरेकर , सदस्या सुनंदा गुहे , माजी नगराध्यक्ष राकेश खुराणा , इन्शुरन्स अँडव्हायझर शहाबुद्दीन अजानी , यवतमाळ जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रूपेश पाटील , युपीएससी - एमपीएससी , मोटीव्हेशनल स्पीकर नरेंद्र पलांदुरकर , सामाजिक कार्यकर्ते हितेशदादा बनसोड , भद्रावती भूषण परमानंद तिराणीक , समाजसेवक विजय चिखले शेल्हाळकर वणी हे उपस्थित होते . डॉ . मंजूश्री जांभरूणकर यांसह रेडिओ वत्सगुल्मच्या आरजे अश्विनी इंगळे व सामाजिक कार्यकर्त्या सौ . सुरेखा आरू यांनाही सकाळ समुहाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या मार्फत केलेले सामाजिक कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 
डॉ . मंजूश्री जांभरूणकर यांना यापूर्वी जेसीआय वाशिम , वूमन्स मेडिकोज वाशिम , नॅशनल इंटीग्रेटेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ( निमा ) , पोलिस बॉईज असोसिएशन वाशिम तसेच अल्टरनेटीव्ह मेडिसिन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इत्यादी तर्फे सन्मानित करण्यात आलेले आहे . त्यांना यावर्षीच्या जागतिक महिला दिनी मिळालेल्या लाभलेल्या या सन्मानामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .