Ticker

6/recent/ticker-posts

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


वाशिम, दि. 28 : शासनाच्या 16 जानेवारी 2020 रोजीच्या पत्रानुसार धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविय्दाल्ये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत सन 2019-20 व डॉ. जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन 2019-20 या दोन्ही योजनेंतर्गत नोंदणीकृत संस्थांनी शासनाने दिलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करत असले, असे सर्व अल्पसंख्यांक शाळा व मदरसांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी भा. ज. वायाळ यांनी केले आहे.