Ticker

6/recent/ticker-posts

अंगणवाडी केंद्रातर्फे स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार


अंगणवाडी केंद्रातर्फे स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार
मान्यवरांनी केले मार्गदर्शन : महिलांनी राबविले स्वच्छता अभियान
वाशीम : एकात्मीक बालविकास नागरी प्रकल्पाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमीत्त पोषण पंधरवाड्यातील स्वच्छता कर्मचारी यांना सहाय्य’ या विषयाच्या अनुषंगाने अंगणवाडी क्र. 76 मध्ये  अण्णाभाऊ साठे समाजमंदिरात संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
    सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले. कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी योगशिक्षिका दिपाताई वानखेडे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी प्रमुख लक्ष्मण बढेल, छाया बढेल, पूजा बढेल, घंटागाडी चालक सूरज हरणे, अक्शय पट्टेबहादुर, अंकुश भांदुर्गे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी लक्ष्मण बढेल यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अंगणवाडी सेविका नंदा कोठेकर यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा अंगणवाडी सेविका विना पिंपळकर यांनी केले. दिपाताईचे स्वागत माला आपटे यांनी, लक्ष्मण बढेल यांचे स्वागत रंजु यादव यांनी, हरणे यांचे स्वागत विना पिंपळकर यांनी, पूजा बढेल यांचे स्वागत ज्योती भडके यांनी केले. पट्टेबहादुरचे स्वागत संगीता पानझाडे यांनी केले. तसेच समाजमंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्याम बढेल यांनी स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. तसेच कचरा टाकण्यासाठी घंटागाडीचा वापर करा याविषयी नागरिकांना आवाहन केले. योगशिक्षिका दिपाताई रवि वानखडे यांनी आहार, आरोग्य, स्वच्छता व योग प्राणायामाविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी कोरोना या आजारासंदर्भात काय दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका रज्जु यादव, ज्योती भडके, नंदा कोठेकर, नंदा गोटे, विना पिंपळकर, रंजना जाधव, छाया इंगोले, कल्पना पदमणे, संगीता पाकधने, संगीता पानझाडे, माला आपटे, सौ. पठाडे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अंगणवाडी सेविका नंदा गोटे यांनी केले. आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका माला आपटे यांनी केले.