स्थानिकांना रोजगाराच्या मागणीची जिल्हाधिकार्यांनी दखल घेण्याची गरज
जनमाध्यम न्युज मिडीया
वाशिम :1 मार्च - जिल्ह्यातून गेलेला समृध्दी महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 चे काम गतीने सुरू आहे. यासाठी लागणारे गौण खनिज मोठ-मोठया नामांकित कन्सट्रक्शन कंपन्यातर्फे शासनाच्या रॉयल्टी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाच्या रॉयल्टीचा महसूल कमी भरून प्रत्यक्षात परवानगीवर नमुद असलेल्या प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक पटीने गौण खनिजाची वाहतूक करण्यात येत आहे. याद्वारे शासनाच्या महसूलाला मोठया प्रमाणात चूना लावणे सुरू आहे. तसेच रस्त्याच्या बांधकामासाठी लागणारे मजूर कार्यालयीन कामकाजासाठी लागणारे सुपरवाझर, लिपीक हे सुध्दा संबंधित मोठे-मोठे ठेकेदार स्थानिक पातळीवरचे भरती न करता बाहेरून उल्लेखित कर्मचारी वर्ग व मजूर त्यांना रोजगार देण्यात येत आहे.
हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी जिल्ह्याचे सर्वेसर्वा प्रशासकीय अँथॉरटी असलेले जिल्हाधिकारी यांनी संबंधित सर्व ठेकेदारांना तात्काळ सूचना आदेशीत करून जिल्ह्यातीलच कुशल व अकुशल कामगार तसेच ड्रायव्हर, सुपरवायझर आणि मजूर हे स्थानिक पातळीवरचेच भरती करण्यासाठी निर्देश देण्याची गरज आहे.
यासाठी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांना तशा आशयाच्या सूचना तात्काळ जारी करणे अगत्याचे आहे. गौण खनिज परवानगी, तसेच या संबंधाने तहसील व एस. डी. ओ. कार्यालयातून सेवानवृत्त झालेले चाकरमाने ठेकेदारांचे हस्तक झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामध्येही अशीच अवस्था आहे. यामुळे स्थानिकांवर अन्याय होत आहे.
बिटोडा भोयर, सावरगाव तसेच तोंडगाव इत्यादी ठिकाणी तसेच उल्लेखित ठिकाणच्या लगतच्या परिसरात या बड्या कंपन्यांनी कार्यालये थाटली आहे. 50 ते 60 च्यावर यांच्याजवळ वाहनांचा ताफा असतो. तसेच रस्ता बांधकामाचे प्रचंड साहित्यही असते.
यासाठी लागणारा कुशल व अकुशल कामगार, ड्रायव्हर वर्ग व सुपरवायझर व लिपीक वर्ग हे स्थानिक पातळीवरून मोठया बांधकाम कंपन्यांनी कामावर घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिल्यास येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी बर्याच अंशी जिल्हा प्रशासनाचा हातभार लागू शकतो, अशी मागणी स्थानिक गरजवंत बेरोजगारांनी केली आहे.