शांतीचा संदेश घेवून सायकलपटू नारायण व्यास राजस्थानात दाखल
नागरीकांनी केले उस्फुर्त स्वागत : 12 मार्चला पोहचणार वाघा बार्डरवर
वाशिम, 4 मार्च - शांती व एकात्मतेचा संदेश घेवून 1 मार्च रोजी वाशीम ते वाघा बार्डर अशा 1800 किलोमिटरच्या सायकल मोहीमेला निघालेले येथील सायकलपटु नारायण व्यास हे मजल दरमजल करीत 4 मार्च रोजी राजस्थानमध्ये पोहोचले. राजस्थानातील झालावार येथे नागरीकांनी व्यास यांचे उस्फुर्त स्वागत केले. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या ऋचा मित्तल, बजरंग सेना नर्मदा विभागाचे प्रदेश महामंत्री यांच्यासह नागरीकांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले व पुढील प्रवासाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या.
नारायण व्यास यांनी याआधी वेगवेगळ्या सायकल मोहीमा आखून थेट दिल्लीपर्यत मजल मारली आहे. यावेळी आपल्या सायकल यात्रेतून देशात शांती, प्रेम, भाईचारा, एकात्मता आदींचा संदेश ते नागरीकांना देणार आहेत. आपल्या या सायकल यात्रेदरम्यान ते राजस्थान, पंजाब आदी पाच राज्य ओलांडून 12 मार्चपर्यत वाघा बॉर्डरपर्यत पोहचणार असल्याचा मानस व्यास यांनी व्यक्त केला आहे. 1 मार्च रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजीक कार्यकर्त्या सौ. अलका गिर्हे, अनिल केंदळे, सागर रावले, उमेश इंगोले, बोंडे, माही चौधरी, आर्यन डाखोरे, प्रशांत बक्शी, महेश धोंगडे, राहुल अवचार, अक्षय हजारे, श्याम खोले, शंकर इंगोले आदींच्या उपस्थितीत व्यास यांनी आपल्या सायकल प्रवासाला सुरुवात केली होती. वाशीमवरुन इंदौर, उज्जैन, कोटा, राजस्थान, अजमेर, पुष्कर, सालासर, हिसार, हरियाणा, अमृतसर ते वाघा बॉर्डर अशा प्रवासादरम्यान रोज 200 किलोमिटरचे अंतर ते सायकलने कापत आहेत.
आजच्या धकाधकीच्या व तणावाच्या जीवनात प्रत्येक मनुष्याने नियमित सायकल चालवुन आपले आरोग्य सुदृढ ठेवावे. यायोगे पर्यावरणाचे रक्षण करुन देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे असे आवाहन नारायण व्यास नागरीकांना करीत आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ