हेअर सलुन बनले ज्ञानाचे भंडार
हेअर सलुनमधे आता पुस्तकं वाचनाचीही सुविधा
शहरातील सिव्हील लाईन येथे विदर्भातील पहिले सलुन - वाचनालय
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सलुनचा प्रेरणादायी उपक्रम
पहाटवारा सहसंपादक काशिनाथ कोकाटे (के. के. रिपोर्टर)
रिसोड - आजची पिढी मोबाईलच्या मोहजाळात अडकलेली असल्याने वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. पुस्तकांशी लोकांचे नाते दुरापास्त होत चालले आहे. अशा परिस्थितीत लोकांना पुस्तकांशी मैत्री करण्याच्या उदेशाने येथील प्रतिक्षा सलुनने थेट सलुनमधेच वाचनालय उघडले असुन, लोकांमधे वाचनसंस्कृती वाढीस लावण्याचा प्रयत्न यानिमित्ताने सुरु करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलुनमधे वाचनालय असलेला हा विदर्भातील बहुतेक एकमेव उपक्रम ठरला आहे.
उदरभरणासाठी केशकर्तनाचा व्यवसाय करणारे संचालक रामकृष्ण कोकाटे हे आपल्या समाजसेवेसाठीही ओळखले जातात. स्त्रीभ्रुण हत्या, स्त्रीशिक्षण, वृक्षसंवर्धन, पाणीजतन, रुग्णसेवा, निराधारांसाठी मदतकार्य अशा मुलभुत सामाजिक प्रश्नांसाठी ते विविध उपक्रम राबवित असतात. लोकांमधे वाचनाचीही आवड निर्माण व्हावी असाही त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी आपल्या सलुनमधे थेट वाचनालयाचीच सुरुवात केली आहे. 14 मार्च रोजी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे
सलुनमधे येणारे ग्राहक कटींग, दाढी, ़फेशियल आदींसाठी येतात. दुकानात गर्दी असेल तर लोक गप्पांमधे वेळ घालवतात किंवा आपल्या मोबाईमधे गुंततात. आज माणसाकडे असलेला प्रत्येक क्षण बहुमोल आहे. तेव्हा गप्पा किंवा मोबाईलवर मोलाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामासाठी या वेळेचा वापर व्हावा या हेतुने रामकृष्ण कोकाटे यांनी सलुनमधेच वाचनालय सुरु करण्याची योजना आखली. यासाठी वाशिम जनमाध्यम जिल्हा प्रतिनिधी संदीपजी पिंपळकर व दैनिक देशोन्नती रिसोड शहर प्रतिनिधी गजानन बानोरे यांचे प्रोत्साहन त्यांना मिळाले आहे. केरळ राज्यातील अशाच एका सलुनमधे वाचनालय सुरु केले असल्याचे सांगून प्रतीक्षा सलुनमधे देखील अशाप्रकारचा उपक्रम सुरु करण्याचे संदीपजी व मनोज जयस्वाल गजानन बानोरे यांनी कोकाटे यांना सुचविले आणी हे सलुन-वाचनालय प्रत्यक्षात अवतरले आहे. सलुनमधे एक विशेष जागा करुन तेथे ही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. विदर्भातील हे बहुतेक एकमेव सलुन-वाचनालय असल्याचे कोकाटे सांगतात.
ग्राहकाच्या ज्ञानात भर पडेल तसेच मनोरंजन होईल अशा प्रकारच्या पुस्तकांचा समावेश यात केला आहे. येथे सर्व वयोगटातील ग्राहक येत असल्याने कोकाटे यांनी प्रतीक्षा सलुन-वाचनालयामधे सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी पुस्तके ठेवली आहेत. यात लहान मुलांसाठी कथा, सामान्यज्ञान, कार्टुन्स, तरुणांसाठी अभ्यासात्मक पुस्तके, ज्येष्ठांसाठी कादंबर्या अशा पुस्तकांचा समावेश केला आहे. सलुनमधे आपल्या क्रमांकाची प्रतिक्षा करत असलेल्या ग्राहकांना वेळेचा सदुपयोग करुन पुस्तकवाचनातुन ज्ञानवृद्धी होणार आहे. त्यांच्या ह्या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील जुनी, अडगळीत पडलेली वाचनीय, ज्ञानवर्धक पुस्तके आम्हाला द्यावी असे आवाहन केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ