Ticker

6/recent/ticker-posts

सार्वजनिक मुत्रीघराची दुरवस्था

सार्वजनिक मुत्रीघराची दुरवस्था


जनमाध्यम न्युज मिडीया
कामरगांव :1 मार्च - कारंजा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व सर्वात मोठी ग्रा. पं म्हणून ओळख असलेल्या कारंजा अमरावती मार्गावरील कामरगाव येथील बसस्थानकावरील तसेच आठवडी बाजारातील सार्वजनिक मुत्रीघराची दुरवस्था झाली असून, त्याची स्वच्छता व दुरुस्ती करावी, अशी मागणी कामरगाव येथील नागरिकांनी स्थानिक सचिवांना 28 फेब्रुवारी रोजी निवेदनातून केली आहे. परंतु,या बसस्थानकावरील व आठवडी बाजारातील सार्वजनिक मुत्रीघराची नियमित स्वच्छता केल्या जात नसल्याने परिसरात दुगंर्धी पसरली असून, त्यामुळे साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.