विदर्भात वरळी मटका - जुगार - कोंबडा बाजार जमावबंदीचे आदेश जुगारून सुरूच
मंत्री व आमदारांच्या चमच्यांना आवरा
किशोर तिवारी यांची उद्धव ठाकरे यांना विनंती
एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,गृह मंत्री अनिल देशमुख रांत्रदिवस जागत कोरोना वायरसशी युद्ध स्तरावर झुंज देत आहे त्याचवेळी सडलेली कणाकणात भ्रष्टाचार संचारलेल्या पोलिसानी वरळी मटका -जुगार -कोंबडा बाजार या अवैद्य धंद्यांचा अत्त्यावश्यक सेवेत समावेश केला असुन प्रत्येक लहान मोठ्या गावात राजरोसपणे सुरु असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कृषी सल्लागार व गृह मंत्री अनिल देशमुख यांचे जवळचे मित्र यांनी केली आहे .
मागील महिन्यातच गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसखात्याला ७ मार्चनंतर राज्यात एकही मटका -जुगार -कोंबडा बाजार या अवैद्य धंद्यांची तक्रार आल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकाला जबाबदार धरून कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र आपण आज यवतमाळ जिल्हातील नेर घाटंजी महागाव यवतमाळ वणी दिग्रस दारव्हा पुसद उमरखेड पांढरकवडा तालुक्यातील मौदा पाटणबोरी रुंझा या ठिकाणचे अहवाल मागितले असता सर्वच ठिकाणी प्रत्येक अड्डयावर कमीत कमी २००ते ३३० आजूबाजूच्या गावातुन आलेले निरपराथ एका रात्रीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत हजारो रुपये गमावत आहेत या अड्डयावर अवैद्य दारू सुद्धा सहज विकल्या जाते अशीही तक्रार किशोर तिवारी यांनी केली आहे .
१० दिवसापूर्वी आपण यवतमाळ जिल्हाधिकारी यांना भेटुन लेखी तक्रार सुद्धा दिली होती मात्र मस्तवाल पोलीस हताश असल्याचे कळले कारण बहुतेक वरळी मटका -जुगार -कोंबडा बाजार या अवैद्य धंद्यांचे मालक जिल्ह्यातील मंत्री आमदार यांचे खास उजवे डावे हात आहेत काहीतर सध्या डॉन झाले आहेत व आपल्या मर्जीचे पोलीस अधिकारी आणतात व समांतर सत्ता चालवीत असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे .
राज्याचे गृहमंत्री यांनी २००४ ते २०१४ एका आदेशाने राज्यात व रळी मटका -जुगार -कोंबडा बाजार या अवैद्य धंद्यांना एका आदेशाने बंदी घातली होती व १० वर्षे रळी मटका -जुगार -कोंबडा बाजार या अवैद्य धंद्यांना सगळ्यांनी रामराम केला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकर्तीत त्यांचेच आमदार मंत्री मटका -जुगार -कोंबडा बाजार या अवैद्य धंद्ये चालविण्यासाठी महीण्याचा दर लाऊन पैसे खात होते आपण याचा व्हिडीओ अख्ख्या महाराष्ट्रात सार्वजनिक केला होता आज पुन्हा लोकलाज विकलेल्या नेत्यांचा कोरोना वायरसशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,गृह मंत्री अनिल देशमुख रांत्रदिवस युद्ध स्तरावर करत असलेली झुंज व त्याच्यावर माती टाकणारे हे समाजकंटक नेते यांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे त्यांचे मंत्रिमंडळाचे सहकारी यांचे खास उजवे डावे हात आहेत त्यांना सांभाळण्याची वेळ त्यांच्यावरच आल्याचे खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे .
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ