जिल्ह्यात 53 गावांमध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र
आपले सरकार सेवा केंद्र निवड यादी प्रसिद्ध
वाशिम :24 फेब्रु.- जिल्हा सेतू समिती अंतर्गत नवीन आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करण्यासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा सेतू समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून वाशिम जिल्ह्यातील 53 गावांमध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अर्जदारांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या अर्जदारांची यादी ुुु.ुरीहळा.पळल.ळप या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवड यादी तयार करण्यात आली आहे. कागदपत्रांमध्ये तफावत अथवा खोटी माहिती सादर केल्याचे दिसून आल्यास झालेली निवड रद्द करून संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्राकरिता निवड झालेल्या अर्जदारांनी पुढील कार्यवाहीसाठी महा-ऑनलाईनचे जिल्हा व्यवस्थापक सागर भुतडा (भ्रमणध्वनी क्र. 9850371671) यांच्याशी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.