शहीद दिनानिमित्त शासकीय रक्तपेढीमध्ये युवकांचे स्वयंस्फुर्त रक्तदान
छावा क्रांतीवीर सेना व रुद्र अपंग संघटनेचा समाजसेवी उपक्रम
वाशीम - सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या छावा क्रांतीविर सेना व रुद्र अपंग संघटनेच्या वतीने शहीद दिनाचे औचित्य साधून 23 मार्च रोजी स्वयंस्फुर्तीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह संघटनेने सोशल माध्यमावर केलेल्या आवाहनानुसार अनेक युवक यावेळी रक्तदानासाठी पुढे सरसावले. या उपक्रमांतर्गत जवळपास 15 युवकांनी यावेळी रक्तदान करुन संकटसमयी जीवदयेचा आदर्श निर्माण केला. यावेळी करोना संकटाची पार्श्वभूमि व धारा 144 लक्षात घेवून रुग्णालयात अनावश्यक गर्दी होवू नये म्हणून ठराविक वेळेच्या अंतराने रक्तदानाचा हा उपक्रम सकाळी 10 वाजतापासून दुपारी 3 वाजेपर्यत यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
सद्यस्थितीत करोना संकटामुळे जिल्ह्यात 31 मार्चपर्यत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसायीक प्रतिष्ठाने बंद आहेत. यासोबतच कलम 144 लागु असून रक्तदानासारखे सामाजीक उपक्रमही बंद आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात येणार्या गंभीर रुग्णांना तातडीच्या वेळी रक्ताची गरज भासु शकते. ही बाब लक्षात घेवून सामाजीक सेवेत अग्रेसर असलेल्या छावा क्रांतीविर सेनेच्या पदाधिकार्यांनी शहीद दिनाचे औचित्य साधून स्वयंस्फुर्तीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत जावून आपले ऐच्छिक रक्तदान केले. तसेच संघटनेने सोशल माध्यमांवरुन केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळून अनेक युवकांनी सुध्दा रक्तपेढीत जावून रक्तदान केले. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे विदर्भ अध्यक्ष गणेश गांजरे, जिल्हाध्यक्ष संतोष व्यास, शुभम भडके, राजेश गोरे, विशाल गाभणे, अशोक गायकवाड, सैयद एजास, राहुल, शाहरुख मुलाजी, आशिष व्यास, कृष्णा इंगळे आदींनी रक्तदानात आपली भूमिका बजावली. रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढीतील सचिन दंडे, मोरे, बांगरे, वानखेडे आदींनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्गादास काळपांडे, गणेश गायकवाड, सुनिल जाधव, पंकज ढोके, तुषार माने, अन्सार मिर्झा, सुधाकर, जितेंद्र व्यास, उमेश चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ