Ticker

6/recent/ticker-posts

जादूटोणा विरोधी कायदा सप्रयोग व्याख्यान कार्यक्रम संपन्न


जादूटोणा विरोधी कायदा सप्रयोग व्याख्यान कार्यक्रम संपन्न 


वाशिम :26 फेब्रु.-    नेहरु युवा केंद्र,  वाशिम व समाज सुधारक संशोधन व प्रशिक्षण बहु. संस्था,  ईलखी यांच्या सहयोगाने थिमबेस वर आधारीत जादूटोणा विरोधी कायदा सप्रयोग व्याख्यान कायक्रमाचे आयोजन शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह,  वाशिम येथे करण्यात आले होते.   कायक्रमाचे सुरुवातीला राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती निमित्त पुष्पहार घालुन मान्यवरांचे हस्ते  दीपप्रज्वलन करुन वंदन करण्यात आले.  कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृह गृहपाल कु. पि. एस. खराटे मॅडम होत्या. मुख्य मागदशक म्हणून पि. एस. खंदारे,  अतिथी म्हणून नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक सम्यक मेश्राम, विलास पंडित,  विनोद पट्टेबहादुर  यांची उपस्थिती होती. यावेळी पि. एस. खंदारे यांनी समाजातील अनिष्ठ रुढी परंपरावर व्याख्यान करुन उपस्थित युवतीना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन यावेळी केले. कायक्रमाचे संचालन प्रविण  पट्टेबहादुर यांनी तर आभार कु. कल्पना शिंदे  हिने मानले. कायक्रम यशस्वीतेसाठी  वनिता अंभोरे,  वैशाली जावळे,  कविता लोखंडे,  योगीता टेंभे यांनी प्रयत्न केले.