जनगणना कंत्राटी तांत्रिक सहाय्यक, बहुकार्य कर्मचारी पदासाठी ’महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी करा
वाशिम, दि. 24 : जनगणना 2021 करिता तांत्रिक सहाय्यक व बहुकार्य कर्मचारी यांची कंत्राटी पध्दतीने 18 महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निकषाची पूर्तता करणार्या इच्छुकांनी त्वरीत ’महास्वयंम’ (ुुु.ारह रीुरूरा.ळप) पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
तांत्रिक सहाय्यक व बहुकार्य कर्मचारी या पदांसाठी 5 मार्च 2020 रोजी सायंकाळी ’महास्वयंम’ पोर्टलवरून पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यात येणार आहे. या पदांसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. शिवाय ’महास्वयंम’ पोर्टलवरही अर्ज करायची आवश्यकता नाही. निकष पुर्ण करणार्या पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करुन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीच्या वेळी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी ’महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी केलेली नव्हती. त्यामुळे होतकरु व पात्र व्यक्ती वंचित राहण्याची शक्यता नाकारतां येत नव्हती. शिवाय आता निकषातही बदल करण्यात आलेले असल्याने पात्र उमेदवारांना पुन्हा संधी निर्माण झालेली आहे. आवश्यक निकषांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ुरीहळा.पळल.ळप या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.