Ticker

6/recent/ticker-posts

जागतीक महिलादिनी अर्धांगिनीचा केला सत्कार


जागतीक महिलादिनी अर्धांगिनीचा केला सत्कार
वाशीम - तालुक्यातील ग्राम उमरा कापसे येथे 8 मार्च रोजी म. ज्योतीबा फुले शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने महिलादिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सुरुवातीला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधवा महिलांच्या हस्ते पुजन करण्यात आले. व या विधवा महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष संतोष खडसे यांनी महिला दिनाच्या औचित्याने आपली अर्धांगिनी व सुखदु:खात साथ देणारी अर्धांगिनी सौ. रेखा खडसे हिचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. या कार्यक्रमामध्ये मुलींना जन्म देणाराया मातांचा सत्कार करुन बालीकांच्या हस्ते महामातांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. संतोष खडसे यांनी महिलांच्या हक्काविषयी व आरोग्याची काळजी याविषयी महिलांना मार्गदर्शन केले. कु. सलोनी श्रृंगारे हिने रमाई व सावित्री यांच्या जीवनावर आधारीत सुंदर असे गित सादर केले. कवि गायक सुरेश श्रृंगारे, ज्ञानुजी श्रृंगारे, नारायण भगत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रा.पं.सदस्य इंदिराबाई श्रृंगारे, ज्ञानुजी श्रृंगारे, नारायण भगत, सुरेश श्रृंगारे, कामिनाबाई श्रृंगारे, दगडाबाई भगत, रेखा श्रृंगारे, मंगलाबाई श्रृंगारे, निर्मला श्रृंगारे, शारदा खडसे, आलोकाबाई खड;े, मयुरी श्रृंगारे, सलोनी श्रृंगारे, सुवर्णा श्रृंगारे, स्वरा श्रृंगारे, श्रीपत खडसे, काळु खडसे, बाळु खउसे, असित खडसे, सुजित खडसे, यश भगत, प्रफुल्ल श्रृंगारे, धम्मदिप इंगोले यांची उपस्थिती होती. संतोष खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.