Ticker

6/recent/ticker-posts

चि.सौ.कां. पूजा व चि. सचिनचे 19 मार्च रोजी शुभमंगल सावधान


दळवी व वाघ परिवाराचा जुळला ऋणानुबंध
चि.सौ.कां. पूजा व चि. सचिनचे 19 मार्च रोजी शुभमंगल सावधान
रिसोड - रिसोड शहराचे श्रध्दास्थान श्री आप्पास्वामी कृपेने रिसोड जि. वाशीम येथील रहिवासी प्रतिष्ठीत नागरीक श्री उत्तम आनंदा दळवी यांची जेष्ठ कन्या, स्व. आनंदा आप्पाजी दळवी यांची नात व श्री संतोष जयराम मोरे ताकतोडा यांची भाची चि.सौ.कां. पूजा यांचा शुभविवाह लेहणी ता. रिसोड जि. वाशीम येथील रहिवासी श्री परसरामजी पुंजाजी वाघ यांचे कनिष्ठ चिरंजीव, स्व. पुंजाजी पिराजी वाघ यांचे नात आणि श्री सदाशिव तुकाराम गुडगे रा. तळणी यांचे भाचे चि. सचिन यांच्यासोबत ठरला असून मिती फाल्गुन कृ. पक्ष 11 गुरुवार 19 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 वा. 33 मिनीटांनी गोरज मुहूर्तावर संत सातारकर महाराज संस्थान रिसोड जि. वाशीम येथे हा विवाह सोहळा समस्त नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तसेच दुपारी 1 ते आगमनापर्यत प्रितीभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 या विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी व व-हाडी मंडळी आणि पाहूण्या मंडळींसाठी खोलेश्वर मित्रमंडळ आणि शिवहिंदु व्यायामशाळा रिसोड हे व्यवस्थापकाच्या भूमिकेतून परिश्रम घेत आहेत.
 या जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधाच्या विवाहगाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि पाहूणे मंडळींच्या साक्षीने आणि आशिर्वादाने अधिक घट्ट करण्यासाठी या विवाह सोहळ्याला आप्तस्वकीय, नातेवाईक व मित्रमंडळींनी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती सौ. अन्नपुर्णा, सौ. निर्मला श्री आत्माराम जिजेबा दळवी, गं.भा. सिंधु रमेश दळवी, सौ. मथुरा श्री उत्तम आनंदा दळवी, गं.भा. रत्नमाला सुरेश दळवी या वडीलधार्‍या मंडळींसह सौ. अनिता श्री अमोल रमेश दळवी, श्री विजय सुरेश दळवी, श्री ओम उत्तम दळवी, श्री अजय आत्माराम दळवी, श्री आकाश आत्माराम दळवी, चि. सार्थक अमोल दळवी, चि.समर्थ अमोल दळवी वसमस्त दळवी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ताईच्या लग्नाला येण्याची विनंती कु. योगीता. राणी, सोनाली, मावशीच्या लग्नाला येण्याची विनंती चि, साई मोरे, माऊली मोरे पुणे, कु. दिव्याणी विभीतपट्टे, चि. कृष्णा विभितपट्टे गंगाखेड, कु. पुजा पवार, चि. साई पवार नाका कनेरगाव, युवराज मांदळे, कन्हैया मांदळे औंढा नागनाथ, श्री वाघ वाढोणा या चिमुकल्या मंडळानी केले आहे.