श्रीक्षेत्र कडोळी येथे 17 मार्चपासून प.पु. स्वामी रमतेराम महाराज पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन
24 मार्च रोजी भव्य महाप्रसाद
कडोळी ग्रामवासीयांची जय्यत तयारी
वाशीम - विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर वसलेल्या व प.पु. स्वामी रमतेराम महाराज व भिमाशंकर महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या हिंगोली जिल्हयातील श्रीक्षेत्र कडोळी येथे 17 मार्चपासून प.पु. स्वामी रमतेराम महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त येथील प.पु. श्री भिमाशंकर गुरु रमतेराम महाराज संस्थानमध्ये 17 मार्च ते 24 मार्चपर्यत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी 24 मार्च रोजी भव्य महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होईल.
सौ. नंदाबाई प्रल्हादराव भाकरे यांच्या सौजन्याने हभप गणेशानंद शास्त्री महाराज भगवतीकर यांच्या रसाळ वाणीतून भाविकांना भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ मिळणार आहे. या भव्य सोहळ्याला हभप किसन महाराज गोरेगावकर यांचे मार्गदर्शन लाभणार असून कडोळी देवस्थानचे पुज्यस्थान असलेले पुजारी महादजी मामा हे अन्नपुर्णा पुजा करतील.
सप्ताहातील दैनंदीन कार्यक्रमामध्ये दररोज सकाळी 4 ते 6 काकडा भजन नेतृत्व हभप दादाराव महाराज इंगोले, देवाबुवा काळबांडे शिवणी, सकाळी 7 ते 8 ज्ञानेश्वरी पारायण, दररोज सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 5 भागवत कथा, सायंकाळी 7 ते 8 श्रीं ची पुजा, रात्री 9 ते 11 हरिकिर्तन राहील. मृदंगाचार्य हभप गणेश महाराज गोरेगावकर, गायनाचार्य हभप ज्ञानबा माऊली गोरेगाव, उध्दव महाराज साबलखेडा, हभप तुकाराम महाराज गोरेगावकर, हभप नामदेवबुवा म्हाळशी, काशिरामबुवा वरुड, हभप मारोतराव म. टो, हभप प्रकाश म. वाघोली, हभप नामदेवराव म. म्हाळसापुरकर व सर्व भजनी मंडळी कडोळी हे हरिपाठ नेतृत्व करतील.
सप्ताहातील कार्यक्रमामध्ये मंगळवार, 17 मार्चपासून 24 मार्चपर्यत अनुक्रमे हभप योगीराज महाराज आळंदीकर, हभप राम महाराज सरकटे आळंदी, हभप किशोर महाराज सुर्यवंशी लातुर, हभप काशिनाथ महाराज फुलकळसकर, हभप पद्माकर महाराज देशमुख अमरावती, हभप धर्मराज महाराज हांडे पुणे, हभप प्रा. सोपान महाराज शास्त्री व शेवटच्या दिवशी 24 मार्च रोजी गुरुवर्य माधव बाबा इंगोले यांचे सकाळी 9 ते 11 पर्यत काल्याचे किर्तन होईल. 24 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता श्रीं च्या पालखी मिरवणूकीचा कार्यक्रम दिंडींच्या सहभागातून होईल. सप्ताहातील या किर्तन कार्यक्रमाला छबुराव नाईक, माझोडचे माजी सरपंच विष्णू निवृत्ती घुगरे, सौ. सिताबाई विष्णू कांबळे, कडोळीचे माजी सरपंच मनमोहन शंकरलाल सोनी, श्री रमतेराम विद्यालयाचे सचिव माधवराव काकडे गुरुजी, शिक्षक सुनिल कांबळे, देवानंद धतुरे, संजय गांजरे, दौलतराव शिंदे औरंगाबाद, मुख्याध्यापक शिवाजी घुगरे व बंडुभाऊ अग्रवाल हैद्राबाद यांचे अभिषेक व सौजन्य सेवा मिळणार आहे.
या सप्ताहाला छबुराव नाईक, सौ. राजु गांजरे, कृष्णा माहोरकर, सुनिल कदम, शिवाजी भाकरे, नामदेवराव कांबळे, नारायण कांबळे, गंगाराम कातडे, संजय हमाने, सौ. संजय मसुडकर, कैलास मते तपोवन, भगवान इंगळे, प्रल्हाद माहोरकर, विजयआप्पा धतुरे आचारी, प्रकाशआप्पा धतुरे आचारी, शिवाजी इंगळे आदी भक्तगण अन्नदानाची सेवा बजावणार आहेत.
सप्ताहातील या ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गोरेगाव, सवना, ब्राम्हणवाडा, वायचाळ पिंपरी, कनेरगाव नाका, कानेरखेडा, फाळेगाव, आडगाव हजारे, देवठाणा, कोकलगाव, विळेगाव, केकतउमरा, वाघोली वाकुडकर, वाघोली शिंदे, गारखेडा, सुरजखेडा, भगवती, पिंपरी खोडे, टो, तपोवन, माहेरखेडा, हिवरा भिसडे, कोयाळी, वनुजा देशमुख, शिरसाट, कोयाळी, मन्नास पिंपरी, वलाना, व्याड, बटवाडी, केंद्रा खु. केंद्रा बु. हाताळा, गोंधनखेडा, जामठी, गोटवाडी, नागमाथा, चौंढी खु. चौंढी बु. माझोड, जुमडा, अटकळी व कडोळी आदी गावातील समस्त गावकरी भक्तजण आणि भजनी मंडऴींचे सहकार्य लाभले आहे.
तसेच श्रीें च्या पालखी सोहळ्याला शिवशक्ती ब्रास पाटी कडोळी, श्री रमतेराम महाराज सांप्रदायिक बँड पार्टी कडोळी, माँ दुर्गा ऑर्गन बँड पार्टी कडोळी, संत पुंडलीकबाबा बँड गोंडेगाव, जयभोले म्युझिकल गायक ऑर्गन पार्टी कडोळी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. याशिवाय श्री रमतेराम महाराज बाल सेवा मंडळी कडोळी यांचे परिश्रम व रमतेराम पाणी फिल्टर प्रतिष्ठानाकडून सप्ताहातील सातही दिवस भक्तांना मोफत थंड पाण्याची सेवा पुरविण्यात येणार आहे.
माजी पं.स. सदस्य नारायणराव माधवराव सुर्यवाड व कडोळीच्या सरपंचा सौ. उषा संतोष माहोरकर यांच्या सौजन्यातुन गायक भजनी मंडळी बाळासाहेब सुरेगावकर, हभप मनोहर महाराज कोठेकर, हभप काशिरामबुवा इडोळीकर, डिगांबरबुवा हे श्रीं च्या चरणी सेवा देतील. तसेच तालसम्राट व महाराष्ट्र भुषण हभप मंगेश महाराज गोरेगावकर, सिंधेसाईज़र व गायक अमोल महाराज नातेपुते, जालना झांकी देखावा प्रदीप काका काळे, वैभव महाराज पुणे यांची या सोहळ्याला सेवामयी उपस्थिती राहील.
तरी सप्ताहातील या सर्व भक्तीमय कार्यक्रमाला व भव्य महाप्रसादाला विदर्भ मराठवाड्यातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प.पु. श्री भिमाशंकर गुरु रमतेराम महाराज संस्थान व श्रीक्षेत्र कडोळी ग्रामवासीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ