Ticker

6/recent/ticker-posts

जाणून घ्या ....कलम 144 कुणाला लागु आहे, कुणाला नाही


जाणून घ्या ....कलम 144 कुणाला लागु आहे, कुणाला नाही
वाशीम - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर नागरीकांच्या जिवित्वाच्या सुरक्षीततेसाठी वाशीम जिल्ह्यात कलम 144 लागु करण्यात आले आहे. अतीआवश्यक प्रसंगी ही कलम लावण्यात येते. हे कलम कुणावर लागु आहे कुणावर नाही याबाबत सविस्तर जाणून घ्या.
यावर असणार मनाई
 जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरूस, जत्रा, मनोरंजनाचे कायर्क्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा. कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, मोर्चे, देशातंर्गत व परदेशी सहली. दुकाने, सेवा, आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा व संग्रहालये. खाजगी ट्रॅव्हल्स, बसेस, राज्य परिवहन महामंडळ बसेस, रूग्ण व अत्यावश्यक सेवेची वाहने सोडून अन्य व्यावसायिक वाहने. सर्व धार्मिक स्थळे भाविकांकरीता बंद राहतील, परंतु नित्य पुजा अर्चा 5 पेक्षा कमी व्यक्तींद्वारे सुरू राहील.
कलम 144 यांना लागू असणार नाही
 शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रूग्णालये, पॅथॉलॉजी लॅबोरटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय दवाखाने, नर्सिंग कॉलेज, बँक, एटीएम व वित्तीय संस्था, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी. शासकीय धान्य गोदाम, शासकीय स्वस्त धान्य दुकाने, अत्यावश्यक किराणा सामान, जिवनावश्यक वस्तू विक्रीची ठिकाणे, दुध, भाजीपाला व फळे विक्रेते, औषधालय, दवाखाने, औषधी कंपन्या, रूग्णवाहिका, पाच पेक्षा कमी व्यक्ती एकावेळी उपस्थित राहतील असे जनावरांचे खाद्य व औषधे विक्री ठिकाण. प्रसारमाध्यमांशी संबंधीत व्यक्ती, पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे कार्यालये, पोस्ट ऑफीसेस, टेलिफोन, इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी, विद्युत व उर्जा तथा पेट्रोलीयम विभागाचे कर्मचारी, पिण्याचे पाणी पुरवठा कर्मचारी. जिवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने (ट्रक), शासकीय / निमशासकीय कर्तव्यावर असणारे व 5 टक्के उपस्थितीचे आदेश असणारे अधिकारी / कर्मचारी.