संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या रक्तदान शिबीरात 116 रक्तदात्यांचे रक्तदान
निरंकारी मिशनचे रक्तदानाचे कार्य हा मानव सेवेचा भाग
- अपर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांचे प्रतिपादन
वाशिम : संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने देशस्तरावर केले जात असलेले रक्तदानाचे कार्य हा एक मानवसेवेचा भाग असून रक्तदान हे निश्चितच इतर दानापेक्षा सर्वश्रेष्ठ दान आहे. असे प्रतिपादन अपर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांनी वाशिम येथे बोलताना केले.
ते संत निरंकारी सतसंग भवनात आयोजित रक्तदान शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की, संत निरंकारी मिशन हे अध्यात्मीक कार्याबरोबरच सामाजिक कार्यालया महत्व देते. ही बाब भूषणावह आहे. ब्रम्हज्ञान हे अंतरंगामध्ये शिरले तर प्रत्येक मानसात माणुसकी निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे ब्रम्हज्ञान हे मिशनचे मुळ सिध्दांत आत्मज्ञान याची आज सर्वांना गरज आहे. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे माणुस अत्यंत प्रगतशिल झाला आहे. मात्र अंतरंगामध्ये माणसाची स्थिती काही वेगळीच आहे. त्यामुळे विज्ञानाला आत्मज्ञानाची जोड देण्याची निरंकारी मिशनची पध्दत सर्वांसाठी सरळसोपी आहे. असे ते म्हणाले.
विजयकुमार चव्हाण यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे, डॉ. पुंडलीक फुपाटे, श्रीराम महाराज जाधव, दत्तात्रय बंडेवार, माधवराव अंभोरे आदिंची उपस्थिती होती. रक्तदान करणार्या दात्यांनी सकाळपासूनच निरंकारी भवनला रक्तदान देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी 116 रक्तदात्यांनी रक्त दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढी विभागाच्या वतीने यावेळी रक्तदात्यांचे रक्त घेण्यात आले. याचवेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाने रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप केले. कार्यक्रमाचे संचालन जनार्धन बोरकर यांनी केले. निरंकारी सेवादलाच्या बंधू भगींनीनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ