Ticker

6/recent/ticker-posts

गोटे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

  गोटे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन



  मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री संजय गोटे हे उपस्थित होते तर महाविद्यालय नॅक समितीच्या सदस्य डॉ.पी.एस.पाथरकर, माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ. दिलीप लांजेवार, प्रा. भारत पट्टेबहादूर यांचीही यावेळेस उपस्थिती होती. 

           अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आजी व माजी विद्यार्थी यांच्यात संवाद निर्माण होऊन माजी विद्यार्थी सध्याच्या स्थितीत कुठल्या प्रकारच्या नोकरी व व्यवसायात आहेत याची माहिती महाविद्यालयास मिळते. कार्यक्रमासाठी एकूण 40 माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी संजय गोटे यांनी यांनी विद्यार्थ्यांनी सतत महाविद्यालयाच्या संपर्कात राहून आपल्या शिक्षकाच्या अनुभवाचा फायदा स्पर्धा परीक्षा व इतर कार्यामध्ये घेतले पाहिजे असे आवाहन केले. याप्रसंगी काही माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.  तर डॉ.पी.एस.पाथरकर यांनी  नॅक मूल्यांकनात माजी विद्यार्थी समितीचे महत्त्व काय आहे या संदर्भातून भाष्य केले. 

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दिलीप लांजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. भारत पट्टेबहादूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले