Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हयातील सर्व कार्यालयातील बायोमॅट्रीक हजेरी बंद


जिल्हयातील सर्व कार्यालयातील बायोमॅट्रीक हजेरी बंद
वाशिम, दि. १६ : कोरोना विषाणूंचा प्रसार राज्यातील कार्यालयांना होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी/ कर्मचारी यांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणुन राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रक काढुन संबंधित सर्व यंत्रणेला आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालयातील बायोमेट्रीक बंद करुन सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुर्वीप्रमाणे हजेरीपटावर उपस्थिती नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.