Ticker

6/recent/ticker-posts

युवा समाजसेवी महेश धोंगडे व अक्षय हजारे यांना इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार जाहीर


युवा समाजसेवी महेश धोंगडे व अक्षय हजारे यांना इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार जाहीर


इंदौर येथे होणार वितरण : सामाजीक कार्याची घेतली दखल


वाशिम :14 फेब्रु.- येथील युवा समाजसेवी महेश धोंगडे व अक्षय हजारे यांना मोरया बहूउद्देशिय संस्था व मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या रक्तदान, नेत्रदान जनजागृती आदी सामाजीक कार्याची दखल एनएएच फाऊंडेशनच्या वतीने इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. 22 फेब्रुवारी रोजी इंदौर येथे या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या बाबतचे निवडपत्र धोंगडे व हजारे यांना पाठविण्यात आले आहे. युवा समाजसेवी महेश धोंगडे व अक्षय हजारे यांनी आपल्या सहकारी मित्रांच्या मदतीने मोरया बहूउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून विविध भरीव सामाजीक कार्य केले आहे. संस्थेशी संलग्नीत मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या माध्यमातून स्वत: रक्तदानासह दानदात्यांपर्यत पोहचून त्यांना रक्तदानासाठी प्रवृत्त केले आहे.   यासोबतच रक्तदान शिबीरे, नेत्रदान जनजागृती शिबीरे, लाईफ सेव्ह बॉक्सच्या आयोजनातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत आदी सामाजीक कार्य सुरु आहेत. रक्तदान मोहीमेअंतर्गत मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या माध्यमातून आजपर्यत अंदाजे 3500 रुग्णांना रक्तदाते व रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. संस्थेला या सामाजीक कार्याची विविध घटकांकडून दखल घेवून विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच संस्था पदाधिकारी महेश धोंगडे व अक्षय हजारे यांना बॉम्बे ब्लड ग्रुपच्या वतीने तासगाव येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उत्कृष्ट रक्तसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या समाजसेवी युवकांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.