Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी मत्स्य संस्थांना होणार जाळे पुरवठा

आदिवासी मत्स्य संस्थांना होणार जाळे पुरवठा


वाशिम :20 फेब्रु.- अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत विशेष केंद्रीय साह्य योजनेनुसार आदिवासी मत्स्य संस्थांना मत्स्य जाळे पुरवठा करण्यासाठी योजना राबवली जात आहे. त्याअनुषंगाने वैयक्तिक स्वरूपात छोट्या नद्या, नाले, तलावात मासेमारी करून आपली उपजीविका चालविण्यासाठी अर्थार्जन करणार्‍या तसेच मत्स्य संस्थेचे सभासद असणार्‍यांना जाळे दिले जाणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी 11 मार्च 2020 पर्यंत आपले अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अर्जासोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, वैयक्तीक स्वरूपात छोट्या नद्या, नाले, तलावात मासेमारी करून आपली उपजीविका चालवीत असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, मत्स्य संस्थेचे सभासद असल्याबाबत संस्थेचे पत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडावे. लाभार्थ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स्वतः उपस्थित राहून कार्यालयात अर्ज सादर करावा. ज्येष्ठतेनुसार व जिल्हानिहाय लक्षांकानुसार लाभार्थी निवड करण्यात येईल, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.