Ticker

6/recent/ticker-posts

समृध्दी महामार्गामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पिकांची भरपाई मिळणार


समृध्दी महामार्गामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पिकांची भरपाई मिळणार


खासदार भावनाताई गवळी यांचा यशस्वी पाठपुरावा 
राज्य रस्ते विकास महामंडळाची मुंबई व वाशीम येथे बैठक
अपघातात मृत व अपंगत्व आलेल्यांना मदत 
एकत्रित पाहणी करुन मदत निश्‍चित करण्याचे निर्देश


कारंजा - राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या पी.एन.सी. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कारंजा तालुक्यात शेतकर्‍यांच्या पिकांची नुकसानभरपाई, अपघातामुळे मृत व अपंगत्व आलेल्यांना खासदार भावनाताई गवळी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. 
 यासंदर्भात 14 फेब्रुवारी रोजी खासदार गवळी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात राज्य रस्ते विकास महामंडळाची बैठक घेण्यात आली होती. याच अनुषंगाने 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक घेण्यात आली असून समृध्दी महामार्गाच्या कामामुळे शेतकर्‍यांच्या पिकांची नुकसान भरपाई व मृत आणि अपंगत्व आलेल्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी सर्व संबंधीत विभागाच्या वतीने पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.
 खासदार गवळी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे.एम.डी. ए.बी. गायकवाड, वाशीमचे उपजिल्हाधिकारी निलेश खोडके, टिम लिडर राणा प्रसाद, सी.ई. सुधाकर मुरादे, एस.ई. सौ. संगीता जयस्वाल, कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे, पीएनसी कंपनीचे संचालक सुभाष इंगळे, ई.ई. गजानन पळसकर यांच्यासह गोपाल पाटील येवतकर, विलास सुरडकर, शंभु जिचकार, वैभव जिरापुरे, मनोज राठोड, उमेश भुसकडे, आनंदराव धुरट, गणेश बाबरे आदींची उपस्थिती होती. सदर बैठकीत नागपूर मुंबई राज्य महामार्गासंबंधीत तक्रारींवर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात एमएसआरडीचे ए.बी. गायकवाड यांनी संंबंधीतांना विविध निर्र्देश दिले. सोबतच समृध्दी महामार्गासंबंधीत एक महिन्याचा कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. 
 या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार भावना गवळी व जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियतंा गजानन पळसकर, कृषी अधिकारी शंकर टोटावार, सर्व तहसिलदार, सर्व  तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.
 समृध्दी महामार्ग योजनेअंतर्गत सुरु असलेल्या रस्ते खोदकामातील धुळीमुळे लगतच्या शेतातील गोभी, टमाटे, वांगे, पालेभाज्या, तुर, हरभरा, गहु आदी पिकाचे नुकसान झाले आहे. या कामामध्ये झालेल्या अपघातात इंजिनिअर गौरव जिरापुरे व शिपाई गौरव वाघेकर यांचा अपघाती मृत्यु झाला आहे. यासोबतच मोखड येथील सौ. गंगाबाई सावरकर, सौ. आम्रपाली तायडे, बुध्दभुषण तायडे व पिंप्री मोडक येथील विजय गवळी यांना अपघाती अपंगत्व आले आहे. तसेच कारंजा तालुक्यातील नारेगाव येथील शेतकरी आनंदराव दोरक, धोत्रा देशमुख येथील किशोर देशमुख, प्रफुल्ल देशमुख, कुपटी येथील पार्वताबाई इंगळे, आखतवाडा येथील प्रशांत भोयर, मंगेश भोयर, मनिष राठोड, प्रतिक भोयर, पोहा येथील देवराव दहातोंडे, डिगांबर दहातोंडे, प्रदीप अवताडे, कुलदिप अवताडे, शामराव अवताडे, नामदेव राऊत, संजय पुणेवार, कल्पना तिरोकार, सौ. अन्नपुर्णा अवताडे, आशा भुसेवार, दोनद येथील घनशाम पाटील, आखतवाडा येथील वैभव जिरापुरे आदी शेतकर्‍यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. 
 यासंदर्भात खासदार भावना गवळी यांच्याकडे असंख्य शेतकर्‍यांच्या आलेल्या तक्रारींवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार भावना यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांनी एकत्रित पाहणी व पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोडक यांनी आदेश दिले. खासदार गवळी यांच्या पाठपुराव्यामुळे व जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशामुळे लवकरच समृध्दी कामात मृत, अपंगत्व व पिकाचे नुकसान झालेल्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे.
  या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, निलेश पेंढारकर, माधवराव ठाकरे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, कारंजा शहरप्रमुख गणेश बाबरे, शंभुराज जिचकार, विलास सुरळकर, उपशहरप्रमुख नामदेव हजारे, गणेश पवार, शाम अवताडे, संतोष सावरकर, सागर तायडे, घनशाम पाटील, वैभव जिरापुरे, किशोर देशमुख, आनंद दारेक यांच्यासह जिल्हयातील शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 दरम्यान कारंजा तालुक्यात समृध्दी महामार्गाच्या तक्रारीसंदर्भात कारंजा शहरप्रमुख गणेश बाबरे यांनी 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून विविध मागण्या केल्या होत्या. 
 या मागण्यांमध्ये, पीएनसी कंपनीच्या अवजड वाहनांमुळे कारंजा तालुक्यातील सहा रस्त्यांचे तात्काळ नुतनीकरण करावे, कामाच्या धुळीमुळे पिकाची नुकसानभरपाई मिळावी, अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळावी, कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा, रस्त्याचे काम होईपर्यत कंपनीची एक रुग्णवाहीका सुसज्ज ठेवावी आदी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. या मागण्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.