Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव येथे महिला नेतृत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबी


मालेगाव येथे महिला नेतृत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर


प्रतिनिधी । 12 फेब्रुवारी
मालेगाव - महाराष्ट्र राज्य औद्योगिक महिला सहकारी संस्थांचा महासंघ बुलडाणा, ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान व नवदुर्गा बहूउद्देशिय महिला मंडळ मेडशी यांच्या संयुक्त विद्यमाने 8 व 9 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती सभागृहात महिला नेतृत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. शिबीराला उद्घाटक म्हणून राजाभाऊ डोणगावकर हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून सुरेखाताई खोत, नंदा गणोदे, आशिष राठोड, डॉ. सिमा चव्हाण, अ‍ॅड. मनिषा दाभाडे, पिंजरकरताई यांची उपस्थिती होती. प्रारंभी दिपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियाताई पाठक यांनी केले. महिलांनी दुसर्‍यावर विसंबुन न राहता छोटे मोठे उद्योग करुन आपला विकास करावा असे मत प्रमुख पाहूण्यांनी व्यक्त केले. शिबीरामध्ये विविध साबण बनविण्याचे प्रकार दिप्ती ओरानी यांनी महिलांना सांगुन त्याचे प्रात्यक्षीक दाखविण्यात आले.
  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशुसखी, कृषीसखी, समुहाचे अध्यक्ष, सचिव तसेच वर्धीनी वनिता खिल्लारे, शालीनी तायडे, सिमा सुरुशे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सौ. आशा तायडे तर आभार सौ. प्रतिभा घुगे यांनी मानले. या शिबीराला जवळपास 226 महिलांनी उपस्थित राहून लाभ घेतला.