संगणक जान पराक्षत श्राशिवाजा शाळेचा विद्याथिनांगाराचव्हाण प्रथम
वाशिम : जनशिक्षण संस्थान द्वारा तालुक्यातील विविध शाळांमध्ये संगणक ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती. संगणकाचा वाढता उपयोग लक्षात घेता विदयार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी वेळेवरच संगणक ज्ञान विकसित करावे. जेणेकरून करून संगणक आधारित सर्व शालेय कामे स्वतः करता यावीत. यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने कित्येक विद्यार्थ्याना डिजिटल साक्षर केले आहे. आजच्या परिस्थितीत किमान कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख अठ्ठावीसपेक्षा जास्त विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देत आहे. यासाठी एकोणवीस वर्षापासून जनशिक्षण संस्थान | कार्यरत आहे. यासाठी भावना इंटरनॅशनल कॉम्प्युटर इन्स्टीट्युट गेल्या तेरा | वर्षापासून संगणक प्रशिक्षण शहरात देत आहे. या संस्थेच्या वतीने झालेल्या | संगणक ज्ञान परिक्षेत तालुक्यातून व शाळेतून प्रथम क्रमांक मिळविलेली वर्ग | १० वी तील विद्यार्थिनी गौरी दत्ता चव्हाण हिचा श्री शिवाजी हायस्कूलच्या | शाखा समिती अध्यक्षा श्रीमती अनिताताई सरनाईक, प्राचार्य डॉ. के. बी. देशमुख, उपमुख्याध्यापक बी.जी. काळे, पर्यवेक्षक पडघान, प्रमूख पाहणे शंकर पातळे एम के सी एल प्रतिनिधी, प्रिया राठोड समन्वयक भावना कॉम्पुटर इन्स्टी.अजय माहुले यांच्या हस्ते संगणक साहित्य देवून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक संपदा मिसार हिने पटकावला तर तिसरा क्रमांक सुशील वैद्य याने मिळविला. कार्यक्रम सर्व विदयार्थी व शिक्षकवृंदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.