Ticker

6/recent/ticker-posts

भगवानबाबा संस्थेच्या वतीने संत रविदास महाराजांना अभिवादन


भगवानबाबा संस्थेच्या वतीने संत रविदास महाराजांना अभिवादन


प्रतिनिधी । 12 फेब्रुवारी
वाशीम - तालुक्यातील ग्राम देपुळ येथे डॉ. आंबेडकर फाऊंडेशन नवी दिेल्ली व भगवानबाबा बहूउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था देपुळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 9 फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ. सतिष भेंडेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. आकाश घुगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजिनिअर साहेबराव बांगर, सामाजीक कार्यकर्ते स्वानंद भेंडेकर, सतिश बांगर, गणेश घुगे यांची उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष तथा आयोजक तातेराव गंगावणे यांनी केले. जयंतीच्या अनुषंगाने अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांनी संत रविदास यांच्या जीवनकार्याची आपल्या मनोगतातून माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन व आभार संस्था सचिव मनिषा आंधळे यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरीक व महिला बहूसंख्येने उपस्थित होते.