आय. टी. सी. चौपाल महोत्सवाचे थाटात उद्घाटन
वाशिम :14 फेब्रु.- महिंद्रा प्रस्तुत आय.टी. सी चौपाल महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, 14 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. महोत्सवाचे उद्धाटन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी फीत कापून केले. या प्रसंगी सहायक कृषी अधिकारी आर.एस.जाधव, महिंद्राचे ग्रामीण व्यवस्थापक विजय सिंग, आय.टी. सी. चौपाल सागरचे व्यवस्थापक प्रदीप राय, संयोजक राजकुमार मुंदडा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. नंतर महिंद्रा, हिरो मोटोकॉर्प लिमिटेड, हिमालया, आय.टी. सी हार्ट, ज्योती लॅबोरेटरीज, विठ्ठल ऑइल आदी स्टॉलचे फित कापून विविध मान्यवरांनी उद्धाटन केले. उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी भाषणे दिली. नंतर झाकलवाडीचे प्रयोगशील शेतकरी सुरेश काळबांडे यांचा सत्कार शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप शेतकर्यांना माहितीपर चित्रपट दाखवून करण्यात आला. हा चौपाल महोत्सव तीन दिवस चालणार आहे. 15 फेब्रुवारीला नृत्य आणि गायन पूर्व चाचणी घेतली जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुशील भिमजियाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी आय.टी. सी चौपाल सागरच्या अधिकारी, कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.