रविवारी जिल्हासामान्य रुग्णालयाच्या आवारात स्वच्छता अभियान
संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनचा उपक्रम
वाशिम :20 फेब्रु.- संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतिने संपुर्ण देशभर 23 फेबु्रवारी रोजी स्वच्छता अभियान राबविल्या जाते. त्याचाच भाग म्हणुन वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात निरंकारी सेवादल बंधुभगीनी स्वच्छता करणार आहेत. हा उपक्रम दरवर्षी केला जातो. त्यामुळे सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक केले आहे. 23 फेबु्रवारी रोजी सकाळी निरंकारी सेवादलाचे सेवादार पुरुष व महिला भगिनी सेवादलाच्या पोशाखामध्ये त्या ठिकाणी दवाखान्याचा परिसर स्वच्छ करतील.
संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने देशभरातील रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ करणे तसेच एकाच दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन यासह वृक्षारोपण असे विविध उपक्रम करण्यासाठी सदैव तयार असतात मनुष्य निर्मीत अथवा निसर्ग निर्मीत आपत्तीमध्ये देखील निरंकारी मिशनचे विशेष योगदानाबाबत केंद्र आणि राज्य शासनाने या मिशनला मानवसेवे बद्दल अनेक वेळा पुरस्कृत केले.