चाफेश्वर गांगवे यांना उत्कृष्ट सूत्रसंचालक पुरस्कार प्रदान
रिसोड :20 फेब्रु.- क्रांतीगुरु बहुउद्देशीय संस्था,गुंधा जि. बुलडाणा यांच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मोजक्याच मातब्बर मान्यवरांना त्या-त्या क्षेत्राचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.या वर्षी सूत्रसंचालन आणि निवेदन यांची दर्जेदार मांडणी करणार्या आणि रसीकांच्या काळजाचा ठाव घेणार्या रिसोड येथील निवेदक आणि कवी चाफेश्वर गांगवे यांना क्रांतीगुरु बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उत्कृष्ट सूत्रसंचालक हा पुरस्कार देऊन दि.20 फेब्रुवारी 2020 रोजी गुंधा येथे गौरविण्यात आले.सदर पुरस्कार हा चाफेश्वर गांगवे यांना सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे भाऊसाहेब झोरे,माजी सभापती केशवराव फुके,समाधान पाटील, पुरुषोत्तम केंद्रे, शिवप्रसादजी सारडा, विठ्ठलराव गिरवलकर, समाधान साठे, महिंद्र बोरकर, भाऊ भोजणे, संस्थेचे सचिव शंकर मानवतकर व अध्यक्ष ह.भ.प. डॉ. नन्हई इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन आश्रुजी फुके यांनी केले. लोकशाहीर आणि साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा हा पुरस्कार यावर्षी प्रथमच निवेदन क्षेत्रात वितरीत करण्यात आला असून निवेदन क्षेत्रात चाफेश्वर गांगवे यांच्या नावाला या पुरस्कारामुळे ऐतीहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
आजपर्यंत असंख्य कार्यक्रमांचे चाफेश्वर गांगवे यांनी निवेदन केले असून निवेदनाच्या प्रवासात चाफेश्वर गांगवे यांची ठळक ओळख रसीकांनी मान्य केली आहे आणि त्याचा पुरावा म्हणूनच या उत्कृष्ट निवेदक पुरस्कारावर चाफेश्वर गांगवे यांचे नाव कोरले गेले आहे.
वाणी आणि लेखणी यांचा एकत्रित संगम झालेल्या चाफेश्वर गांगवे यांचे या पुरस्कारामुळे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
-----------------------------------------------------
निवेदनाच्या माध्यमातून दररोज मुशाफिरी घडवून आणणार्या रसीक श्रोत्यांचा,निवेदनाला बळ देणार्या सर्व शाईच्या गणगोताचा हा पुरस्कार आहे. मी मात्र फक्त निमित्त मात्रच अशी प्रतिक्रिया चाफेश्वर गांगवे यांनी यावेळी दिली आहे.