सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची मागणी
मंगरुळपीर : गोरगरीब रुग्नांना मदत व्हावी आणी तसेच सर्व प्रकारच्या आजारावरील ऊपचाराकरीता आरोग्य विभागाशी समन्वय साधुन रुग्नांना ऊपचाराची सोय ऊपलब्ध करुन देन्यासाठी आरोग्य मित्र या योजनेच्या माध्यमातून येणार्या काळात आरोग्य मित्र योजनेचे पदाधिकारी गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठीचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत कार्यरत राहतील या अनुषंगाने आरोग्य मिञांची नियुक्ती करन्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.
आरोग्य मिञ संकल्पनेच्या माध्यमातुन शासकीय, मुंबई व पुणे येथील मोठ्या मोठ्या धर्मार्थ रुग्णालयात राबविण्यात येणार्या सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया (कॅन्सर, ब्रेन ट्युमर, हार्ट सर्जरी, डोळ्याचे ऑपरेशन, हाडांचे ऑपरेशन इ. तसेच अनेक नानाविध रोगांचे उपचारासाठी व ग्रामीण भागातील व शहरातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसृती, कुटुंब नियोजन ऑपरेशन व सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी मदत करणे, तसेच दवाखान्यात दाखल करणे, गावोगावी आरोग्याची जनजागृती करणे, रक्तदान शिबीर घेणे असे अनेक कामे हे आरोग्य मित्र म्हणून काम करणार्या व्यक्तीकडे सोपवुन ज्याला समाज सेवेची आवड आहे अशा व्यक्ती निवड करण्यात यावी जेणेकरुन गोरगरीब रुग्नांना मदत आणी आधार मिळेल.
आरोग्य मिञांची रितसर मुलाखती घेवुन नियुक्ती करुन मानधनही देन्याची व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.
या संकल्पनेच्या माध्यमातुन आरोग्य विभागालाही या आरोग्य मिञांची मदत होईल.