राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 240 प्रकरणे निकाली
वाशीम - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या निदेर्शानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. गो. बिलोलीकर होते. यावेळी 240 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, न्यायिक अधिकारी एस. एम. मेनजोगे, एस. पी. शिंदे, पी. एच. नेरकर, श्रीमती एस. व्ही. फुलबांधे, श्रीमती डॉ. यु. टी. मुसळे, जी. बी. जाणकार, एम. एस. पौळ, एस. पी. बुंदे, जिल्हा विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष अँड. बबनराव इंगोले आदी उपस्थित होते.