Ticker

6/recent/ticker-posts

ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मीडिया विंगच्या वतीने पत्रकारांचा सत्कार (पहाटवारा सहसंपादक के. के. रिपोटर रिसोड)


ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मीडिया विंगच्या वतीने पत्रकारांचा सत्कार
(पहाटवारा सहसंपादक के. के. रिपोटर रिसोड)
रिसोड - प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय रिसोडच्या मीडिया विंगच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मकुमारीज विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा.गजाननराव लक्रस, पंजाबराब नाना देशमुख, डॉ. अजय पाटील अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन रिसोड, सहसंचालीका ब्रह्माकुमारी गीता दिदी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 सर्वप्रथम दीपप्रज्वलन करण्यात येऊन मान्यवरांचे स्वागत विद्यालयाकडून ब्रह्माकुमारी वंदना दीदींनी केले. त्यानंतर तालुक्यातील शहरी व ग्रामीण पत्रकारांचा यथोचित सत्कार ज्योती दिदी व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. प्रसारमाध्यमे समाज घडविण्याचे व समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करीत असतात. समाज अधिक स्वस्थ बनविण्यासाठी सकारात्मक विचाराने प्रेरित वृत्तांकन करण्याची आवश्यकता आहे. पत्रकार करीत असलेल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. विद्यालयाने केलेला सत्कार म्हणजे पत्रकारांच्या चांगल्या कार्याची घेतलेली दखल असून भविष्यात अधिक चांगले कार्य करण्यासाठी दिलेल्या सदिच्छा असल्याचे मनोगत राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी व्यक्त केले. रिसोड तालुक्यातील पत्रकाराचे संघटन चांगले असून शहरातील विधायक कार्यात पत्रकार संघटना सदैव अग्रेसर असतात. ज्योती दिदीचे कोणत्याही कार्याचे नियोजन उल्लेखनीय असते. विद्यालयाने अतिशय नियोजनबद्ध पत्रकारांचा केलेल्या सत्कारामुळे माउंट अबू येथील नियोजनाची अनुभूती झाल्याचे मनोगत प्रसिद्ध व्यापारी पंजाबराव नाना देशमुख यांनी केले.
 डॉ. अजय पाटील यांनी असे कार्यक्रम सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले तर प्रा. लक्रस सरांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार पत्रकारिता बदलली मात्र पत्रकाराची जबाबदरी आजही तेवढीच महत्वपूर्ण आहे आणि पत्रकारांकडुन समाजाला आजही मोठया अपेक्षा आहेत. पत्रकारांच्या वतीने उद्धवराव जटाळे, शेख अन्सारोद्दीन, काशिनाथ कोकाटे, शीतल धांडे इत्यादींनी मनोगत व्यक्त करताना विद्यालयाने केलेला सत्कार म्हणजे भविष्यात अधिक योग्य कार्य करण्याची प्रेरणा असल्याचे मत व्यक्त केले व दिदींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्माकुमारी गीतादिदीनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मीडिया विंगचे सदस्य रवि अंभोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी वंदना दिदी, ब्रह्माकुमारी वर्षा दिदी, मीडिया विंगचे प्रा.रवि अंभोरे सह विद्यालयाचे सर्व ज्ञानार्थीनी परिश्रम घेतले.