Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्यापासुन युवकांनी प्रेरणा घ्यावी जेष्ठ कलावंत संजय कडोळे यांचे प्रतिपादन


स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्यापासुन युवकांनी प्रेरणा घ्यावी
जेष्ठ कलावंत संजय कडोळे यांचे प्रतिपादन


(साप्ताहिक पहाटवारा प्रतिनिधी)


कारंजा - स्वामी विवेकानंद उत्सव समिती कारंजा तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने 12 जानेवारी रोजी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद तथा राष्ट्माता, राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा जयंती कार्यक्रम स्वामी विवेकानंद उत्सव समिती कारंजाचे अध्यक्ष तथा राज्य शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त संजय मधुकर कडोळे यांच्या अध्यक्षतेखाली श्री कामक्षामाता मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आला.
    कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ना. संजय राठोड मित्रमंडळ नेरचे कार्यकर्ते हिम्मत मोहकार, जेष्ठ कलावंत शेषराव पाटील इंगोले, लोमेश पाटील चोधरी, प्रा. राहुल महाजन, सतीश भेलांडे, रोहीत महाजन, लक्ष्मन बागडे, कमलेश कडोळे, कैलाश हांडे, रमेश देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत मांडतांना संजय कडोळे म्हणाले की, युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद तथा राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे जीवन चरित्र व कार्यापासुन युवकांनी प्रेरणा घेवून राष्ट्राप्रती व समाजाप्रती स्वाभिमान जागृत ठेवावा. तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त युवकांनी रक्तदान व देहदान चळवळीकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन कडोळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रोहीत महाजन तर आभार प्रदर्शन रमेश वानखडे यांनी केले.